प्रतिनिधी
बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (7 मे) कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे डिलीव्हरी पार्टनर्सशी संवाद साधला. त्यांनी विविध कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या ऐकून घेतल्या. यासोबतच राहुल गांधींनी या कामगारांसोबत मसाला डोसा आणि कॉफीचा आस्वादही घेतला.Rahul Gandhi eats masala dosa with delivery partners, rides a bike, employees complain about low pay
राहुल गांधींसोबतच्या संभाषणादरम्यान, कामगारांनी तक्रार केली की बेरोजगारीच्या समस्येमुळे त्यांना कमी पगाराच्या नोकऱ्या करण्यास भाग पाडले आहे. राहुल गांधींनी त्यांच्याशी त्यांच्या आवडत्या खेळांविषयीही चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या आवडत्या फुटबॉल खेळाडूंबद्दल विचारले. स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि डंझोसारख्या एग्रीगेटर्सचे डिलिव्हरी पार्टनर बंगळुरूमधील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यासोबत जेवण करताना दिसले.
राहुल गांधी यांनी जाणून घेतल्या समस्या
काँग्रेस पक्षाने ट्विट केले की, राहुल गांधी यांनी आज बेंगळुरूमधील प्रतिष्ठित एअरलाइन्स हॉटेलमध्ये कामगार आणि डंझो, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट इत्यादींच्या डिलिव्हरी पार्टनर्स यांच्याशी संवाद साधला. एक कप कॉफी आणि मसाला डोसा घेतला. त्यांनी डिलिव्हरी पार्टनर्सचे जीवन, स्थिर रोजगाराचा अभाव आणि मूलभूत वस्तूंच्या वाढत्या किमती यावर चर्चा केली. या तरुणांनी या नोकऱ्या का घेतल्या आहेत आणि त्यांची कामाची स्थिती काय आहे हेही त्यांनी जाणून घेतले.
Shri @RahulGandhi's outreach to gig workers and delivery partners in Bengaluru is a part of his unwavering commitment to the issues of every section of society. pic.twitter.com/uQXB3H8YyD — Congress (@INCIndia) May 7, 2023
Shri @RahulGandhi's outreach to gig workers and delivery partners in Bengaluru is a part of his unwavering commitment to the issues of every section of society. pic.twitter.com/uQXB3H8YyD
— Congress (@INCIndia) May 7, 2023
राहुल गांधींच्या रोड शोवर भाजपचा आरोप
यानंतर राहुल गांधी बेंगळुरूमधील त्यांच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी दुचाकीवरून जाताना दिसले. दुसरीकडे, भाजपने राहुल गांधींच्या बेंगळुरूमधील रोड शो आणि सभांची खिल्ली उडवली. सर्वाधिक अल्पसंख्याक लोकसंख्या असलेल्या भागात राहुल यांचा रोड शो अशा प्रकारे आखण्यात आला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी म्हणजेच 10 मे रोजी मतदान होणार असून शनिवारी म्हणजेच 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App