वृत्तसंस्था
बंगळुरू : भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तिरुवेकरे येथे एका 34 मिनिटांच्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व PFI पासून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणापर्यंत सर्वच मुद्यांवर उहापोह केला.Rahul Gandhi criticizes Savarkar Said- Savarkar used to take money from British, Sangh supported British rule
भारताच्या फाळणीविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले – स्वातंत्र्ययुद्धात सावरकर इंग्रजांसाठी काम करत होते. त्यांना इंग्रजांकडून त्याचा मोबदलाही मिळत होता. काँग्रेस खासदार म्हणाले -देशाची जनता भ्रष्टाचारामुळे त्रस्त असून, सरकार हे मॅनेज करण्यासाठी माध्यमांना नियंत्रित करत आहे.
राहुल पुढे म्हणाले – राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ब्रिटीशांच्या राजवटीचे समर्थन केले होते. आज त्यांच्याच द्वेषाविरोधात भारत जोडो यात्रा काढली जात आहे.
भारत जोडो यात्रेचा 2024 च्या निवडणुकांशी कोणताही संबंध नसल्याचा दावाही राहुल यांनी यावेळी केला. पण राहुल यांच्या यात्रेचा मार्ग पाहता काँग्रेसचे देशभरातील 372 जागांवर लक्ष केंद्रीत असल्याचे स्पष्ट होते. ग्राफिक्समधून जाणून घ्या त्या जागांविषयी…
अदानींचा नाही मोनोपॉलीचा विरोध
यावेळी त्यांनी अदानी समुहाच्या गुंतवणुकीसंबंधीच्या एका प्रश्नालाही आपल्या शैलीत उत्तर दिले. राहुल म्हणाले – मी कॉर्पोरेट्सना विरोध करत नाही. माझा मोनोपॉलीला विरोध आहे. राजस्थानात प्रक्रियेनुसार सर्वकाही सुरुळीत आहे. सरकारने कोणत्याही अधिकाराचा गैरवापर करत अदानींना फायदा पोहोचवला नाही. भविष्यात असा कुणी फायदा पोहोचवला, तर सर्वात अगोदर मी त्याचा विरोध करेल.
PFI बंदीवर म्हणाले – जातीयवादाविरोधात संघर्ष
राहुल यांनी यावेळी PFI वरील बंदीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, भारतात द्वेष व जातीयवाद पसरवणाऱ्या सर्वच शक्तींशी काँग्रेस लढेल. मग ती कोणत्याही समुदायाची का असेना. भारत जोडो यात्रा हाच द्वेष व हिंसाचाराविरोधात काढली जात आहे.
काँग्रेस अध्यक्ष रिमोट कंट्रोलने चालणार नाहीत
राहुल यांनी यावेळी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष स्वतंत्रपणे काम करणार असल्याचेही स्पष्ट केले. काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे आताच सांगता येणार नाही. पण जे कुणी या खुर्चीवर बसतील, ते आपल्या इच्छेनुसार काम करतील. गांधी-नेहरू कुटुंबातील कुणीही त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे ते रिमोटने चालतील असे म्हणणे त्यांचा अवमान ठरेल, असे राहुल म्हणाले.
कर्नाटकातील सीएम चेहरा निवडणुकीनंतर ठरेल
कर्नाटकात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? या प्रश्नाचेही राहुल गांधींनी उत्तर दिले. ते म्हणाले – काँग्रेसच्या नियमानुसार निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल. या पदासाठी काँग्रेस नेते सिद्धरमय्या व काँग्रेस प्रदेशाध्यक्षश्र डी के शिवकुमार शर्यतीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App