नाशिक : केंद्रातले मोदी सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उंगल्या करायला गेले, पण साधी INDI आघाडीच्या खासदारांची एकजूट नाही टिकवू शकले!!, अशी राहुल गांधींच्या राजकीय कर्तृत्वाची आज पुन्हा एकदा नोंद झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI नुसती हरलीच नाही तर फुटली सुद्धा. कारण काँग्रेस सकट बाकीच्या विरोधी पक्षांची अपेक्षित असलेली 324 मते बी. सुदर्शन रेड्डी या उमेदवारांना मिळू शकली नाहीत. त्यांना फक्त 300 मते मिळू शकली. NDA आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाली. याचा अर्थ INDI आघाडीची 25 ते 30 मते फुटली.Rahul Gandhi couldn’t save opposition unity in vice presidential election
INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी राहुल गांधींचे लाल संविधान हातात घेऊन प्रचार केला. ते INDI आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या घरी जाऊन आले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरले. सगळ्या नेत्यांबरोबर फोटो सेशन केले. पण ते जिंकून येऊ शकले नाहीत. सत्ताधारी NDA आघाडीची मते फोडू शकले नाहीत. उलट विरोधी INDI आघाडीचीच मते फुटली. राहुल गांधींनी मलेशियातून केलेली खेळी वाया गेली. उभी दांडी आडवी झाली. INDI आघाडीच्या खासदारांनी मतपत्रिकेवर मारलेली उभी दांडी त्यांच्याच उमेदवाराला आडवी करून गेली.
– उभ्या दांडीचा प्रयोग फसला
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये INDI आघाडीच्या नेत्यांनी म्हणे “लय भारी आयडिया” लढवली. हे मतदान EVM वर बटन दाबून नसून मतपत्रिकेवर होते. त्यामुळे बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावासमोर असलेल्या रकान्यात उभी दांडी मारून मतदान करायचे ठरविले. त्याप्रमाणे INDI आघाडीच्या खासदारांनी मतपत्रिकेवर रेड्डी यांच्या नावासमोर उभी दांडी मारली. ती मतपत्रिका पेटी टाकली. त्यानंतर मतांची मोजणी झाली. त्यावेळी उभ्या दांडीची मते विरोधकांच्या आघाडीच्या संख्याबळापेक्षा कमी ठरली. म्हणजेच उभी दांडी मारायची आयडिया आडवी झाली. विरोधकांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीत पडलेच, पण विरोधकांचे संख्याबळ टिकून राहिले नाही. ते घटले. बाहेर मतदान चोरीचा मोठा बवाल उभा करून मलेशियाला निघून गेलेल्या राहुल गांधींना विरोधकांच्या आघाडीच्या खासदारांची मते देखील आपल्या बाजूने वळवता आली नाहीत किंवा ती टिकवून धरता आली नाहीत.
– समाजवादी खासदारांची मते फुटली
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीने विरोधकांची राजकीय बुद्धिमत्ता किती तोकडी आहे, हेच दाखवून दिले. राहुल गांधींनी मतदान चोरीचा बाहेर मोठा बवाल उभा केला. पण तो करून काही उपयोग नाही झाला. नुसत्या mock voting चा प्रयोग करून भागले नाही. म्हणूनच INDI आघाडीची मते फुटली. हातात असलेली खासदारांची मते सुद्धा त्यांना वाचविता आली नाहीत. काँग्रेस सोडून इतर खासदारांना त्यांना पटविता आले नाही. समाजवादी पक्षाच्या खासदारांची मते फुटल्याचा संशय असताना देखील राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही. परिणामी मोठा पराभव पदरी पडला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App