Rahul Gandhi : “भारतमातेची हत्या” हे शब्द लोकसभेच्या कामकाजातून काढले; पण राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत त्याच शब्दांनी आरोप केले!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावा दरम्यान राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणात “भारत मातेची हत्या”, “गद्दार”, “देशद्रोही”, “मार दिया”, असे शब्द वापरले होते मात्र लोकसभेच्या सभापतींनी आपले अधिकारात हे शब्द संसदीय कामकाजातून वगळले. कायद्याच्या कसोटीवर संसदेत हे शब्द उतरत नाहीत हे पाहिल्यावर राहुल गांधींनी आपले स्ट्रॅटेजी बदलत पत्रकार परिषदेत तेच शब्द वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जुनेच आरोप केले. rahul gandhi blame bharatmata hatya in press conference

राहुल गांधी आज काँग्रेस मुख्यालयात दुपारी 3.00 वाजता पत्रकार परिषद घेतली. भाजपने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे, आयडिया ऑफ इंडिया संकल्पनेला खतम केले आहे, असा आरोप केला. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गांभीर्य गमावल्याचाही आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले. पण त्या भाषणात शेवटची 2 मिनिटे फक्त ते मणिपूरवर बोलले. पण मणिपूर वर बोलताना ते हसत होते. खिल्ली उडवत होते. त्यांच्या भाषणात गांभीर्य नव्हते, असा आरोप राहुल गांधींनी केला.

मणिपूर दौऱ्याचा अनुभव

त्याचवेळी मणिपूरच्या दौऱ्याचा अनुभव त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मणिपूरमध्ये आम्ही जेव्हा लँड झालो, त्यानंतर कुकी आणि मैतेई अशा दोन्ही विभागांमध्ये मी गेलो. पण दोन्ही ठिकाणी मला हे स्पष्ट सांगितले गेले की मैतेई विभागात तुम्ही येत असाल आणि तुमच्या सुरक्षा व्यवस्थित कोणी कुकी असेल, तर आम्ही त्याला मारून टाकू. त्यामुळे तुम्ही कुकी व्यक्तीला तुमच्याबरोबर मैतेई विभागात आणू नका, तशीच घटना कुकी विभागातही घडली. कुकी विभागात जाण्यापूर्वी मला सूचना देण्यात आली की तुमच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणी मैतेई असेल, तर त्यालाही हटवा. त्याला कुकी विभागात आणू नका. अन्यथा आम्ही त्या मैत्रीला गोळ्या घालू.

याचा अर्थ मणिपूर आता एक राज्य राहिलेले नाही. ते दोन विभागात विभाजित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूर जळताना पाहायचे आहे त्यांना त्याच्यावर उपाय करायची इच्छा नाही. मणिपूरमध्ये कोणत्याही प्रकारे शांतता आणा एवढेच माझे म्हणणे आहे. त्यात तुम्ही तिथे सैन्य पाठवा किंवा दुसरी काही उफाययोजना करा, पण मणिपूर जळत असेल तर ते थांबवा, अशी मागणी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केली.

पण राहुल गांधींनी लोकसभेत भाषण करताना मणिपूरमध्ये भाजपने भारतमातेची हत्या केली. ते करणारे देशद्रोही गद्दार आहेत, अशी भाषा वापरली होती. यातले असंसदीय शब्द लोकसभेच्या सभापतींनी काढून टाकले. हे पाहताच राहुल गांधींनी स्ट्रॅटेजी बदलून आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये परत एकदा तेच शब्द उच्चारले, जे संसदीय कामकाज करून सभापतींनी काढून टाकले होते!! मणिपूरमध्ये भाजप सरकारने भारतमातेची हत्या केल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला.

rahul gandhi blame bharatmata hatya in press conference

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात