विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतात हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे हेतूने जातिगत जनगणनेला खतपाणी घालून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करणार राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण विरोधी वक्तव्य केले. काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर आरक्षण संपविण्याचा योग्य वेळी विचार करू, असे राहुल गांधी जॉर्ज टाउन विद्यापीठात म्हणाले. भाजप सह इतर काँग्रेस विरोधकांनी राहुल गांधींना त्यावरून चांगले ठोकून काढले. आपले आरक्षण विरोधी वक्तव्य अंगलट आलेले पाहून राहुल गांधींनी नंतर घुमजाव केले. उलट आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा वाढविण्याची वकालत केली.
पण राहुल गांधींनी घुमजाव करूनही फारसा फायदा झाला नाही. काँग्रेसचा आरक्षण विरोधी बेसूर चेहरा जनतेसमोर उघड्यावर यायचा, तो आलाच. त्यामुळेच भाजप, बसप, लोजप, जदयू या सगळ्या विरोधकांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना ठोकून काढले. पण हा सगळा प्रकार सुरू असताना राहुल गांधींच्या मित्र पक्षांचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे मात्र मूग गिळून आळीमिळी गुपचिळी करून राहिले. पवार किंवा ठाकरे स्वतः तर काही बोलले नाहीतच, पण त्यांच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते देखील राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्यावर मूग गिळून गप्प राहिले.
Nagpur Mihan : नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी चेहऱ्यावरचा बुरखा फाडला. पण एरवी भाजपच्या किंवा महायुतीच्या कुठल्याही नेत्याच्या कुठल्याही वक्तव्यावर बाहेर येऊन भडाभडा बोलणारे संजय राऊत, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना उपदेश करणारे रोहित पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्यावर चकार शब्द काढला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App