भाषा उच्च अर्थतज्ज्ञांची; प्रत्यक्षात भलामण चिनी मालाची!!, असेच चित्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वेगवेगळ्या राजकीय कृतींमधून समोर आली.
राहुल गांधींनी गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातल्या विशेषत: दिल्ली मधल्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना भेटी देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जे व्हिडिओ शेअर केले. त्यातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या make in India या संकल्पनेची खिल्ली उडवली, पण प्रत्यक्षात त्यांनी चिनी मालाची भलामण केल्याचेच समोर आले.
राहुल गांधी जिथे जिथे गेले, तिथे त्यांनी छोट्या मोठ्या उद्योजकांना त्यांच्या औद्योगिक उत्पादनाची माहिती विचारली. त्याचे कॉम्पोनेंट्स विचारले. त्यामध्ये भारतीय उत्पादने किती वापरली, अन्य देशातली उत्पादने किती वापरली याची माहिती काढून घेतली. भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने चिनी कच्च्या मालावर किंवा पक्क्या मालावर कशी अवलंबून आहेत, हे त्यांनी छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या तोंडून वदवून घेतले. त्यांचे व्हिडिओ शेअर केले. भारतीय उद्योगांची स्थिती जाणून घेणे हा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात भारतीय उद्योगांमधल्या उणिवा सांगताना तुम्ही चीनवरच अजून कसे अवलंबून आहात, हे त्यांनी मोदी सरकारला हिणवले.
त्याही आधी राहुल गांधींनी चिनी ड्रोन्स संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता. भारताचे ड्रोन मार्केट वाढत असले तरी ते चिनी मालावरच अवलंबून आहे. चीन ज्या पद्धतीने ड्रोन विकसित करतो त्या पद्धतीने भारताने ड्रोन्स विकसित केले नाहीत हे त्यांनी त्या व्हिडिओतून सांगून मोदी सरकारला डिवचले होते. (पण त्यानंतर चिनी ड्रोन्स आणि शस्त्रास्त्रांची पोल ऑपरेशन सिंदूर मध्ये कशी खोलली गेली हे मात्र राहुल गांधींनी सांगितले नाही.)
Sharad Pawar शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक
राहुल गांधींनी छोट्या मोठ्या उद्योगपतींच्या तोंडून वदवून जी चिनी मालाची भलामण केली, तीच रघुराम राजन यांनी उच्च अर्थतज्ज्ञाच्या भाषेत मोदी सरकारला सुनावली.
रघुराम राजन यांनी फ्रंटलाईनला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी उच्च आर्थिक भाषेत परिशीलन केले. भारताच्या आर्थिक वाढीचा वेग सध्या 6.5 % च्या आसपास आहे> तो सध्या जरी पुरेसा असला< तरी तो भविष्यकाळासाठी पुरेसा नाही< असे सांगताना रघुराम राजन यांनी भारताने दुसरा चीन व्हायच्या फंदात पडू नये म्हणजेच उत्पादन क्षेत्राच्या मागे लागू नये, असे सांगितले. भारत आणि दुसरा ड्रॅगन व्हायचे स्वप्न सोडून द्यावे, असे ते म्हणाले. भारताने त्याच्या पारंपारिक सेवा क्षेत्रामध्ये आणि कौशल्य विकासामध्ये जास्त लक्ष घालावे. उत्पादन क्षेत्रात चीनशी स्पर्धा करायला जाऊ नये कारण या जगामध्ये दुसऱ्या चीनसाठी स्थान निर्माण होणार नाही, अशी भविष्यवाणी रघुराम राजन यांनी केली.
चीन आणि व्हिएतनाम यांच्यासारखी देश उत्पादन क्षेत्र काबीज करून बसलेत. जगातले कुठलेही उत्पादन ते स्वस्तात करू शकतात, तसे भारताला जमणार नाही. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था फारशी सुधारणार नाही, अशी मखलाशी त्यांनी केली. त्याचवेळी भारताने मशीन असेंब्ली, मशीन दुरुस्ती देखभाल, प्लंबिंग यांच्यासारख्या क्षेत्रात कौशल्य विकास करावा तिथून नोकऱ्या निर्माण कराव्यात अशी सूचना केली.
जणू काही भारतामध्ये उत्पादन क्षेत्रात झेप घेणारे उद्योजकच नाहीत आणि भारताची उत्पादने जगभरात विकलीच जात नाहीत, अशा थाटात रघुराम राजन यांनी उच्च अर्थतज्ज्ञाच्या भाषेत मोदी सरकारला उपदेश केला.
वास्तविक राहुल गांधी आणि रघुराम राजन यांनी आज जाणीवपूर्वक बुद्धिभेद केला. भारताचे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढते स्थान त्याचबरोबर उच्च अभियांत्रिकी तंत्रज्ञानातले कौशल्य याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले किंबहुना भारताने त्याकडे दुर्लक्ष करावे हे अप्रत्यक्षपणे सूचित केले. भारताने सगळा माल चीनकडूनच विकत घ्यावा. इथे त्याची असेंब्ली करावी, इतपतच भारतीयांची लायकी आहे असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. यातून त्यांनी फक्त मोदी सरकारला टोचले असे नाही, तर भारतीयांच्याच एकूण वकूबाविषयी आणि त्यांच्या बुद्धी, कौशल्य आणि दर्जा विषयी दाट शंका उत्पन्न केली. पण प्रत्यक्षात त्यांनी चिनी मालाची भलामण करून त्याची एजंटगिरीच केल्याचे लपून राहिले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App