विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा लोकसभेत उकरून काढला. राहुल गांधींनी साधारण महिनाभरापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर महाराष्ट्रातल्या मतदार यादीवर ठळक प्रश्नचिन्ह लावणारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. परंतु, निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात स्पष्ट खुलासे देखील केले होते.
या सगळ्या घडामोडीला साधारण महिनाभर उलटून गेल्यानंतर राहुल गांधींनी लोकसभेत आज पुन्हा तोच महाराष्ट्रातल्या मतदार यादी यांचा प्रश्न उकरून काढला. मतदार याद्या सरकार बनवत नाही, हे लोकसभेचे सभापती म्हणाल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण मतदार याद्यांवर लोकसभेत चर्चा तर होऊ शकतेच ना!!, असा उल्लेख करून त्यांनी त्या चर्चेचा आग्रह धरला.
https://x.com/RahulGandhi/status/1899003437347709221
महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. भाजप महायुतीला प्रचंड यश मिळाले असा राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा प्रमुख आक्षेप होता. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर सगळे 288 विधानसभा मतदारसंघ मिळून एकदम 76 लाख मतदान कसे वाढले??, असा सवाल त्यांनी केला होता. या सवालाला निवडणूक आयोगाने सविस्तर उत्तर देखील दिले होते. त्यानंतर मतदार यादी यांचा विषय राहुल गांधी किंवा सुप्रिया सुळे यांनी काढला नव्हता. तो आज महिनाभरानंतर राहुल गांधींनी पुन्हा उतरून काढला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App