विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेतून केंद्र सरकारने कोणताच धडा न घेता ते गाफील राहिले. यातून दूरदृष्टी आणि नेतृत्वाचा अभावच दिसून येतो, अशी टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांनी केली आहे.Raghuram Rajan lashes on govt.
तुम्ही जर योग्य काळजी घेतली असती, दक्ष राहिला असता तर तुम्हाला हे लक्षात यायला हवे होते की संसर्ग अद्याप संपलेला नाही.’’ असे राजन यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
जगभरातील अन्य देशांकडे नजर टाकली असती तर इतरत्र काय घडते आहे हे सहज लक्षात आले असते. उदाहरणच द्यायचे झाले तर ब्राझीलचे देता येईल.
हा विषाणू संपलेला नाही तो परत डोके वर काढू शकतो हे यातून सहज समजले असते, असेही राजन यांनी स्पष्ट केले.पहिल्या लाटेतील आंशिक यशामुळे आपण लोकसंख्येच्या प्रमाणात लशी देखील तयार करू शकलो नाही.
अनेकांना असे वाटले की कोरोनाला हाताळण्यासाठी आता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे आणि आपण संथगतीने लसीकरण करू शकतो. आता संसर्ग वाढल्यानंतर केंद्राने लसीकरणाला वेग दिला असल्याचे त्यांनी सांगितले
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App