विशेष प्रतिनिधी
वाराणसी : Prime Minister Narendra Modi भारतीयांच्या घामातून, मेहनतीतून आणि कौशल्यातून तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूला ‘स्वदेशी’ म्हणतात,” अशी साधी आणि प्रभावी व्याख्या करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये नागरिकांना “व्होकल फॉर लोकल” या मंत्राचे महत्त्व समजावून देत, स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे आवाहन केले.Prime Minister Narendra Modi
वाराणसी येथे सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. याच कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचे वाटपही करण्यात आले. मोदींनी सांगितले की, या योजनांमुळे शेतकऱ्यांना थेट आधार मिळत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते आहे.Prime Minister Narendra Modi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील काही उत्पादने आणि सेवा यांच्यावर २५% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता अधोरेखित करत पंतप्रधान मोदींनी देशवासियांना ‘स्वदेशीचा निर्धार’ करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “घरात येणारी प्रत्येक नवीन वस्तू स्वदेशी असली पाहिजे. प्रत्येक भारतीयाने देशी उत्पादनांची निवड करणे ही देशसेवाच आहे. व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनीही स्वदेशी वस्तू विकण्याची प्रतिज्ञा घ्यावी. आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी विदेशी ऐवजी देशी वस्तू खरेदी कराव्यात. यामागे केवळ आर्थिक नाही, तर सांस्कृतिक आणि राष्ट्रीय गर्वाची भावना आहे. ही खरी महात्मा गांधींना श्रद्धांजली ठरेल.
मोदींनी जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेवर भाष्य करताना सांगितले की, अनेक देश सध्या स्वहितकेंद्रित धोरणं अवलंबत आहेत. भारतानेही आता आपले हित जपण्यासाठी सजग राहिले पाहिजे. भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा आत्मविश्वास व्यक्त करत त्यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या मोहिमांची आठवण करून दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App