प्रतिनिधी
पुष्पा द राईज चा प्रचंड यशानंतर “झुकेगा नही साला” असं म्हणत “पुष्पा द रूल” हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अल्लू अर्जुनचा त्यातील फर्स्ट लूक बघण्यासाठी चाहत्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे.Pushpa 2 is coming, making people crazy..
टॉलिवूड सिनेमा म्हटलं की ॲक्शन सीन्सची टर उडवणे हीच इमेज डोळ्यासमोर येते. पण टॉलिवूडच्या बाहुबली या सिनेमा मनंतर प्रेक्षकांचा टॉलिवूड सिनेमाकडे बघण्याचा अँगलच चेंज झालेला आहे. बाहुबली सारख्या ॲक्शन व ऐतिहासिक सिनेमाने प्रचंड यश कमवल्यानंतर टॉलिवूडच्या बऱ्याच सिनेमांनी बॉलिवूडला मागे टाकत लोकांच्या मनात घर केले आहे. त्यातीलच एक सिनेमा म्हणजे “पुष्पा द राईज”. त्यातील डायलॉग, त्यातील गाणी, त्यातील ॲक्शन ही लोकांच्या मनाला भुरळ पाडणारी ठरली आहे. अगदी लहान मुलांच्या बोबड्या बोलातून देखील ‘झुकेगा नही साला’ हे वाक्य ऐकू येते.
कोरोनाच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघण्याची उत्सुकता कमी झालेली दिसत होती. पण पुष्पाने तोच प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहाकडे वळवला आणि पुन्हा चित्रपटगृहात तुटुंब गर्दी होऊन हाउसफुल्लचे बोर्ड लागू लागले आणि याच सिनेमाचा दुसरा पार्ट “पुष्पा 2 द रूल” प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचीच आतुरता रसिकांना लागून राहिली आहे.
सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित या ॲक्शन ड्रामा फिल्म मध्ये घडलेल्या ॲक्शन, स्टोरी लाईन चाहत्यांमध्ये टॉलिवूड सिनेमांची क्रेज वाढवणारी ठरली आहे आणि यातूनच अल्लू अर्जुनचा पुष्पा राज या कॅरेक्टरने प्रत्येक भारतीयांच्या मनावर गारूड केले आहे. पुष्पा टू मध्ये टॉलिवूडचा सुप्रसिद्ध रामचरण अभिनेता देखील दिसणार आहे. 8 एप्रिला चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत पुष्पाचा पहिला लूक रिलीज होणार आहे. चाहत्यांचा या उत्साहानंतर “पुष्पा 2 द रूल” देखील प्रचंड यश मिळविण्याच्या प्रतिक्षेत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App