वृत्तसंस्था
अयोध्या : अयोध्येत श्री राम मंदिराच्या परिसरातील जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. या उलट बाजारभावापेक्षा कमी दराने जमीन खरेदी केली आहे, असे श्रीरामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने स्पष्ट केले आहे. जमिनीबाबत होत असलेले आरोप हे राजकीय हेतूने केले जात आहेत, अशा शब्दात विरोधकांचे कान रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के महासचिव चंपतराय बंसल यांनी उपटले आहेत. Purchase of land at below market price, Clear from the Ram Temple Trust; All allegations denied
समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री तेजनारायण पांडेय पवन यांनी राम मंदिराच्या परिसरातील बाग बिजेशी येथील जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून रविवारी खळबळ उडवून दिली होती. त्यांचे सर्व आरोप ट्रस्टने खोडून काढले आहेत. ट्रस्टने सांगितले की, जमिनीबाबत अगोदरच करार झाला होता आणि बाजारभावापेक्षा कमी दराने जमीन खरेदी केली होती.
२ कोटींची जमीन ट्रस्टने केवळ १० मिनिटात १८.५० कोटींना खरेदी सुल्तान अन्सारी यांच्याकडून खरेदी केली, असा आरोप तेजनारायण पांडेय पवन यांनी केला होता. मात्र ट्रस्टने तो खोडून काढला आहे. या जमिनीच्या आसपासचा दर हा २ हजार रुपये प्रति चौरस फूट असताना ट्रस्टने ही जमीन १४२३ रुपये या प्रमाणे खरेदी केली. जी बाजारभावापेक्षा कमी दरात असल्याचे स्पष्ट होते. १२ हजार ८० चौरस मीटर क्षेत्र ट्रस्टने सुल्तान यांच्याकडून खरेदी केले.
कोणतीही फसवणूक नाही: सुल्तान अन्सारी
जमीन ट्रस्टला विकणारे सुल्तान अन्सारी यांनी सांगितले की, संबंधित जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात आम्ही आणि ट्रस्टने कोणतीही फसवणूक केलेली नाही. एक दशका अगोदर जमीनीचे दर कमी होते. तेव्हा २ कोटी रुपयांचा करार केला होता. खरी गोष्ट अशी की, राम मंदिराच्या उभारणीत सहकार्य लाभावे म्हणून सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी असलेल्या दराने ट्रस्टला जमीन विकली आहे. यात कोणताच गैरव्यवहार झालेला नाही.
जमीन आणि किंमत दृष्टिक्षेपात
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App