महाराष्ट्र आणि पंजाब, छत्तीसगड ही तीन राज्येच कोरोनाविरुध्दच्या लढाईत कमी पडतेय असे केंद्रीय पथकाच्या पाहणीत दिसून आले आहे. केंद्रीय पथकाने हा अहवाल दिल्यावर केंद्र सरकारने या तीनही राज्यांना पत्र लिहून खडसावले आहे.Punjab and Chhattisgarh, along with Maharashtra, fall in the battle against Corona central says
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि पंजाब, छत्तीसगड ही तीन राज्येच कोरोनाविरुध्दच्या लढाईत कमी पडतेय असे केंद्रीय पथकाच्या पाहणीत दिसून आले आहे. केंद्रीय पथकाने हा अहवाल दिल्यावर केंद्र सरकारने या तीनही राज्यांना पत्र लिहून खडसावले आहे.
टेस्टींग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टींग, कंटेन्मेंट मोहीम, हॉस्पिटलमधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकारने पाठविलेल्या पत्रात प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात ५० हजारांहून अधिक रूग्ण गेल्या काही दिवसांत सापडले आहेत.
पंजाब आणि छत्तीसगडमध्येही करोनाचा संसर्ग वाढतोय. या पार्श्वभूमीवर केंद्राने या तिन्ही राज्यांना पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे या तीनही राज्यांत सरकारमध्ये कॉँग्रेस आहे. महाराष्ट्रत शिवसेना- राष्ट्रवादी बरोबर कॉँग्रेस आघाडीमध्ये आहे. तर पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कॉँग्रेसची सत्ता आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबला पत्र लिहिले आहे. या राज्यांमधील जिल्ह्यांमध्ये तैनात केंद्रीय पथकांच्या मूल्यांकनाच्या आधारावर हे पत्र लिहिण्यात आले आहे. केंद्र सरकारने या पत्रात टेस्टींग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टींग, कंटेन्मेंट मोहीम, हॉस्पिटलमधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
या तिन्ही राज्यांमध्ये वेगवगेळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. काही ठिकाणी कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होत नाही. काही ठिकाणी टेस्टींगची यंत्रणाच नाही. हॉस्पीटलमधील पायाभूत सुविधांचाही मोठा प्रश्न आहे.
राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या त्रुटींसंबंधी केंद्राने हे पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडला हे पत्र लिहिण्यात आले आहे. अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारने ५० केंद्रीय आरोग्य पथके रवाना केलेली आहेत.
महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथकं आहेत. छत्तीसगडच्या ११ जिल्ह्यांमध्ये आणि पंजाबच्या ९ जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथकं तैनात आहेत. करोनाने बिघडत असलेल्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्राची आरोग्य पथके सूचना आणि मार्गदर्शन करत आहेत.
प्रत्येक जिल्ह्यांत दोन सदस्यांचे एक पथक आहे. ही पथकं आपल्या पाहणीचा रोजचा अहवाल मंत्रालयाने नियुक्ती केलेल्या नोडल अधिकाºयाला पाठवत असतात.आता आरोग्य मंत्रालयाने तिन्ही राज्यांमधून आलेल्या अहवालांवरून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्ह्यांचे नाव उघड करून तेथील त्रुटींची माहिती दिली आहे. ज्यात सुधारणा करता येऊ शकते, याचा उहापोह करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App