देशप्रेमाची शिक्षा! पाकिस्तानच्या विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांना विरोध केला म्हणून चार विद्यार्थ्यांना काढले होस्टेलबाहेर


विशेष प्रतिनिधी

चंदीगड: पाकिस्तानने भारताचा पराभव केल्याचा जल्लोष करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, पंजाबमधील भटिंडा बॉईज होस्टेलच्या प्रशासनाने उफराटा न्याय लावत जल्लोषाला विरोध करणाºया उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विद्यार्थ्यांवर होस्टेलबाहेर काढण्याची कारवाई केली आहे.Punishment of patriotism! Four students were expelled from the hostel after protesting against Pakistan’s victory

पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना विरोध केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर आहे. होस्टेलमधील तोडफोडीचा दंड विद्यार्थ्यांना भरण्याचे निर्देश दिले आहेत. पण काश्मिरी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.होस्टेल रिकामे करण्यासाठी विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी ३० आॅक्टोबरच्या रात्री होस्टेलच्या शिस्त मोडली आहे. बाबा फरीद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या कॅम्पस आणि हॉस्टेलच्या नियमांविरोधात आहे, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना आपल्या सामानासह २४ तासांत हॉस्टेल रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

कुमार कार्तिकेय ओझा, आयुष कुमार तिवारी, उज्ज्वल पांडे आणि आयुष कुमार जैस्वाल अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्वजण पदवीच्या पहिल्या आणि शेवटच्या वषार्चे विद्यार्थी आहेत.
विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून संताप व्यक्त केला जात आहे.

बाबा फरीद इन्स्टिट्यूटमधील चार बिहारी विद्यार्थ्यांच्या छळावर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहावे, असे सागर पांडे या नागरिकाने म्हटले आहे. देशविरोधी कारवायांचे समर्थन केल्याबद्दल या संस्थेची मान्यता तात्काळ काढून टाकावी लागेल. तसेच हॉस्टेलचा आदेश अन्यायकारक असल्याचेही म्हटले जात आहे.

Punishment of patriotism! Four students were expelled from the hostel after protesting against Pakistan’s victory

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात