देशवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणे ही आमची प्राथमिकता – पंतप्रधान मोदी

PM Modi

नागपूरमधील एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या नागपूर दौऱ्यात माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरची पायाभरणी केली. यानंतर, पंतप्रधान मोदींनी तिथे एका जाहीर सभेलाही संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस खूप खास आहे. गुढीपाडवा साजरा केला जात आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण नागपुरातील संघ सेवेच्या या पवित्र यात्रेत एका पवित्र संकल्पाचे साक्षीदार होत आहोत. माधव नेत्रालयाचे नवीन संकुल सेवा कार्याला चालना देईल आणि हजारो लोकांच्या जीवनात प्रकाश आणेल. त्यांच्या आयुष्यातील अंधारही दूर होईल.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव नेत्रालयाशी संबंधित सर्व लोकांचे त्यांच्या कार्य आणि सेवेबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लाल किल्ल्यावरून मी सर्वांच्या प्रयत्नांबद्दल बोललो होतो, आज देश आरोग्याच्या क्षेत्रात ज्या पद्धतीने काम करत आहे, माधव नेत्रालय त्या प्रयत्नांना चालना देत आहे. देशातील सर्व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात ही आमची प्राथमिकता आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या केवळ दुप्पट केली नाही. तर, आम्ही देशात कार्यरत असलेल्या एम्सची संख्या देखील तीन पटीने वाढवली आहे. देशातील वैद्यकीय जागांमध्येही दुप्पट वाढ झाली आहे, येणाऱ्या काळात लोकांची सेवा करण्यासाठी अधिकाधिक चांगले डॉक्टर उपलब्ध होतील.

Providing good healthcare facilities to the countrymen is our priority PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात