द केरला स्टोरी : 32000 मुलींचे इस्लाम मध्ये धर्मांतर झाल्याचे सिद्ध करा आणि 1 कोटी मिळवा; केरळच्या मुस्लिम युथ लीगचे आव्हान, शशी थरूरांचा पाठिंबा

प्रतिनिधी

नवी दिल्ली : द केरला स्टोरी सिनेमाचा टिझर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर भूकंप झाला. केरळमध्ये 32000 हिंदू मुलींचे इस्लाम मुळे धर्मांतर करून त्यांना आय एस आय एस या दहशतवादी संघटनेतून लढायला सिरीयाला पाठवल्याचे धक्कादायक माहिती पुढे आली आणि केरळच्या राजकीय – सामाजिक लिबरल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Prove 32000 girls converted to Islam and get 1 crore

द काश्मीर फाइल्स हा जसा प्रोपोगांडा सिनेमा होता, तसाच केरला स्टोरी हा प्रोपोगंडा सिनेमा आहे असा प्रचार लिबरल गँगने चालवला आहे. त्यामध्येच काँग्रेसचे खासदार शशी जरूर सामील झाले आहेत.

पण त्यापुढे जाऊन केरळ मधली एक संघटना मुस्लिम युथ लीग केरळा स्टेट कमिटीने हा सिनेमा खोटा ठरवण्यासाठी एक आव्हान दिले आहे. 32000 केरळी मुलींचे इस्लाम मध्ये धर्मांतर झाल्याचे सिद्ध करा त्याचे पुरावे द्या आणि एक कोटी रुपये मिळवा, असे ते आव्हान आहे आणि या आव्हानाला शशी थरूर यांनी हवा दिली आहे. आपल्या ट्विटर हँडल वरून या आव्हानाचा टिझर त्यांनी शेअर केला आहे.

द केरला स्टोरी या सिनेमाच्या नावाला विरोध म्हणून नॉट माय केरला स्टोरी असा हॅशटॅग चालवला जात आहे. या हॅशटॅगला देखील समर्थन दिले आहे. सिनेमात दाखवलेला केरळ आमचा नव्हेच, असे कॅन्सल कल्चर यातून लिबरल गॅंगला निर्माण करायचे आहे. केरळ मधले डाव्या पक्षांचे सरकार आणि काँग्रेस यामध्ये आघाडीवर आहे त्यात आता मुस्लिम युथ लीगची भर पडली आहे.

केरळ मध्ये लव्ह जिहाद जुनाच

केरळमध्ये इस्लामीकरण मुळातच फार जुना फिनॉमिनन आहे. अगदी 1921 पासूनचा मोपला बंडाचा काळा इतिहास त्याला आहे. केरळचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतनंदन यांनी 2010 मध्येच लव्ह जिहाद संदर्भात गंभीर इशारा दिला होता, इतकेच नाही कम्युनिस्ट पार्टीने त्यानंतरही अंतर्गत पत्रके वाटून लव्ह जिहादच्या धोक्याविषयी पक्षाच्या केडरची जागृती करण्याचा प्रयत्न केला होता.

कम्युनिस्ट सरकार नाकारते वस्तुस्थिती

पण आताच्या पिनराई विजयन या कम्युनिस्ट मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने मात्र लव्ह जिहादची वस्तुस्थिती नाकारली आहे. पण म्हणून लव्ह जिहाद थांबलेला नाही. काही महिन्यांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने लव्ह जिहादच्या 4000 केसेसची यादी सादर केली होती. या केसेस संदर्भात मात्र पिनराई विजयन सरकार मूग गिळून गप्प आहे. आता जेव्हा द केरला स्टोरी सिनेमा केरळमधील भयानक परिस्थितीवर झगझगीत प्रकाश टाकत आहे, त्यावेळी ही आमच्या केरळची स्टोरीच नाही, असा हॅशटॅग चालवून असे कॅन्सल कल्चल डेव्हलप केले जात आहे.

नार्को जिहादचा धोका

इतकेच नाही तर केरळमध्ये गैरमुस्लिमांना संपविण्यासाठी केवळ लव्ह जिहादच नव्हे तर नार्कोटिक्स जिहादही करण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा आरोप केरळचे कॅथलिक बिशप मार जोसेफ कल्लरंगट्टा यांनी केला आहे. जिहादींद्वारे केवळ लव्ह जिहाद पसरवला जात नाही तर आता नार्कोटिक जिहाददेखील पसरवला जात आहे. या लोकांना फक्त गैर मुस्लिमांना संपवायचे आहे. जे लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते फक्त वास्तवापासून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. याकडे फक्त प्रेमविवाह म्हणून पाहिले जाऊ नये. ही एक युद्धनीती आहे.

बिशप म्हणाले, लव्ह जिहाद व्यतिरिक्त आता नार्कोटिक्स जिहाद देखील केरळमध्ये पसरत आहे. जिहादींना समजले आहे की, भारतासारख्या देशात कोणालाही शस्त्रास्त्रांनी संपवले जाऊ शकत नाही. या कारणास्तव, आता त्यांनी नवीन डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. या जिहादींचा एकच उद्देश आहे. त्यांचा धर्म वाढवणे आणि सर्व गैर मुस्लिमांना संपवणे. त्यांनी लव्ह जिहाद आणि नार्कोटिक जिहादचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

बिशप म्हणाले, नार्कोटिक जिहाद म्हणजे गैर-मुस्लिमांना, विशेषत: तरुणांना, ड्रग्सचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य खराब करण्याची क्रिया आहे. कट्टर जिहादींनी चालवलेल्या आइस्क्रीम पार्लर, हॉटेल्स आणि ज्यूस कॉर्नरमध्ये विविध प्रकारची ड्रग्स वापरली जात आहेत. ते गैर मुस्लिमांना बिघडवण्यासाठी विविध प्रकारची ड्रग्स शस्त्र म्हणून वापरत आहेत.

केरळमधील कॅथलिक मुली देखील प्रेम आणि नार्कोटिक्स जिहादच्या बळी ठरत आहेत. केरळमध्ये एक गट खूप सक्रिय झाला आहे. त्यांचे काम फक्त प्रेम आणि नार्कोटिक्स जिहाद पसरवणे आहे. केरळच्या जनतेने आता अशा सर्व लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. जिहादी मानसिकता पसरवण्याची कोणालाही परवानगी दिली जाऊ शकत नाही.

अमली पदार्थांच्या वापराला प्रोत्साहन देणाºया रेव्ह पार्ट्या आणि अशा घटनांमधून जप्त करण्यात आलेली ड्रग्स ही आपल्यासमोर नार्कोटिक्स जिहादची वस्तुस्थिती मांडतात. मी अशा अनेक लोकांना पाहिले ज्यांनी ड्रग्सचं व्यसन लागल्यावर नोकरी गमावली किंवा अभ्यास सोडून दिला.

Prove 32000 girls converted to Islam and get 1 crore

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात