वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या मेघालयातील गावांमध्ये प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. 27 मार्च रोजी इछामती परिसरात दोन जणांचे मृतदेह आढळून आले होते. ईशान सिंग (24) आणि सुजित दत्ता (35) यांची सीएएच्या निषेधादरम्यान खासी स्टुडंट युनियन (KSU) च्या सदस्यांनी हत्या केल्याचा दावा करण्यात आला होता.Protest against arrest of KSU members in Meghalaya; 2 youths were killed during CAA agitation
पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी केएसयूच्या दोघांना अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता KSU त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे.
CAA आंदोलनादरम्यान दोन ठार
27 मार्च रोजी इशान सिंग (24) आणि सुजित दत्ता (35) यांचे मृतदेह इछामती परिसरात सापडले होते. सुजितच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते की, इछामती मार्केटमध्ये CAA विरोधात आंदोलन करण्यात आले होते. केएसयूची बैठकही झाली. तेथे उपस्थित लोकांनी माझ्या मुलावर हल्ला करून त्याची हत्या केली.
सुजितचा धाकटा भाऊ सुशील सांगतो की, या घटनेनंतर आमच्या घरातून बाहेर पडण्यास कोणीही मागेपुढे पाहत नाही. कोणी कामावरही गेले नाही. माझा भाऊ सुजित हा मजूर होता. खून झाला तेव्हा तो कामावर गेला होता.
सुशील पुढे म्हणाला की त्यादिवशी दुपारी 3 वाजता मी पण बाजारात जाण्याचा विचार करत होतो. पण केएसयूची बैठक होत असल्याचे कळल्यावर मी घरीच थांबलो. लहान भाऊ सुजितकडे मोबाईल नव्हता. सायंकाळी 5.30 च्या सुमारास भावाचा मित्र घरी आला आणि त्याने सुजितला केएसयूच्या सदस्याने पकडल्याचे सांगितले.
पूर्व खासी हिल्सचे एसपी ऋतुराज रवी यांनी सांगितले की, केएसयूचे दोन सदस्य शानबोरलांग शाती (26) आणि मेसादाबोर स्कंबिल (26) यांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, ही हत्या सीएए निषेधाशी संबंधित आहे की नाही, याची पुष्टी झालेली नाही.
ऋतुराज पुढे म्हणाले की, केएसयू सदस्य आरोपींच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनेही केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App