खलिस्तान समर्थक खासदार सिमरतजीत सिंह मान यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड; अमृतपाल सिंहच्या एन्काऊंटरची पसरवली अफवा!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दल अमृतसर या पक्षाचे पंजाब च्या संगरूरचे खासदार सिमरजित सिंह मान यांचे ट्विटर अकाउंट सरकारने सस्पेंड केले आहे. खलिस्तानवादी म्होरक्या अमृतपाल सिंह याचा एन्काऊंटर झाल्याची अफवा सिमरतजित सिंह मान यांनी पसरवली होती. त्यानंतर त्यांचे ट्विटर अकाउंट सरकारने सस्पेंड केले.Pro-Khalistan MP Simranjit Singh Mann’s Twitter account withheld in India following his fearmongering over the crackdown on Amritpal Singh



इतकेच नाही तर, खासदार सिमरतजित सिंह मान यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंट वर खलिस्तान समर्थक आणि खलिस्तानला स्वतंत्र आणि सार्वभौम देश मानणारा बायो ठेवला होता. भारतीय संसदेत भारतीय राज्यघटनेला अनुसरून शपथ घ्यावी लागते. मान यांचा बायो या शपथेचाच भंग करत होता.

अमृतपाल सिंह यांच्या एनकाउंटर ची अफवा पसरवल्याबद्दल सध्या सरकारने सिमरतजित सिंह मान यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले आहे. आता संसदेतील शपथेचा भंग केल्याबद्दल सरकार पुढची कारवाई काय करते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pro-Khalistan MP Simranjit Singh Mann’s Twitter account withheld in India following his fearmongering over the crackdown on Amritpal Singh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात