लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन करणाऱ्या खलिस्तानवाद्यांना तिथल्या तिथे भारतीयांचे चोख प्रत्युत्तर!!

वृत्तसंस्था

लंडन : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून खलिस्तानवादी समर्थकांनी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला लंडन मधल्या भारतीयांनी तिथल्या तिथे चोख आणि खणखणीत प्रत्युत्तर दिले.

लंडन सह युरोपमध्ये खलिस्तानवाद्यांचा लिबरल विश्वात जोर चालतो. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय सण समारंभाच्या दिवशी मुद्दामून खलिस्तानवादी किंवा अन्य फुटीरतावादी भारता विरुद्ध आंदोलन करतात. युरोपीय माध्यमे त्या आंदोलनांना मोठी प्रसिद्धी देतात. परंतु आता युरोप मधले भारतीय देखील जागृत झाले असून ते फुटीरतावाद्यांच्या विरोधात तिथल्या तिथे उतरून प्रतिआंदोलन करताना दिसतात.

हेच चित्र आज लंडनमध्ये दिसले. भारतीय हाय कमिशन समोर खलिस्तानवाद्यांनी आंदोलन छेडताच भारतीयांनी त्यांच्या समोरच तिरंगा हातात घेऊन खलिस्तान आणि पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने केली.

pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात