लडकी हूँ लड सकती हूँ म्हणणारी प्रियंका गांधींची पोस्टर गर्लच भाजपमध्ये प्रवेश करणार


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात लडकी हूॅँ, लड सकती हूॅँ असे म्हणत उत्तर प्रदेशात प्रचार सुरू केला आहे. राज्यात अनेक होर्डींग्जही लावण्यात आले आहेत. मात्र, या पोस्टरवरील पोस्टरगर्लनेच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.Priyanka Gandhi’s poster girl who says I can fight as a girl will join BJP

महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. प्रियंका मौर्य या काँग्रेसच्या लडकी हूँ, लड सकती हूँ… या कॅम्पेनच्या पोस्टर गर्ल आहेत. या कॅम्पेनच्या जाहिरातीवर त्यांचा फोटो झळकला आहे. त्यामुळे, त्या प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जात. मात्र, आता त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.डॉ. प्रियंका मौर्य भाजपात प्रवेश करणार आहेत. लखनौ येथील भाजप कार्यालयात जाऊन त्या भाजप प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या तिकीट वाटपावर त्यांनी नाराजी व्यक्त करत गंभीर आरोपही केले आहेत. प्रियंका गांधी वाड्रा यांचे सचिव संदीप सिंह यांनी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारीचं तिकीट देण्यासाठी लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेसने माझ्या नावाचा, चेहऱ्याचा आणि 10 लाख फॉलोअर्सचा वापर करुन घेतला. मात्र, तिकीट देतेवेळी मला सचिव संदीप सिंह यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. मी पैसे न दिल्यानेच माझे तिकीट कापण्यात आल्याचे प्रियंका मौर्य यांनी म्हटले आहे. या सगळ्यांचे पुरावेही आपल्याकडे आहेत, वेळ आल्यात ते सादर करेने, असेही त्या म्हणाल्या.

Priyanka Gandhi’s poster girl who says I can fight as a girl will join BJP

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात