सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवर प्रियांका गांधी भडकल्या; खरा – खोटा भारतीय तुम्ही नाही ठरवू शकत, म्हणाल्या; पण आता कोर्टाचा अवमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात याचिका!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनची बाजू उचलून धरून भारतीय सैन्य दलांवर टीका केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचे कान उपटले. सच्चा भारतीय असली वक्तव्ये करणार नाही, अशा शब्दात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना फटकारले. त्याबरोबर राहुल गांधींच्या भगिनी खासदार प्रियांका गांधी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवरच भडकल्या. करा आणि खोटा भारतीय कोण हे तुम्ही नाही ठरवू शकत, असे म्हणाल्या. पण आता प्रियांका गांधी यांचे हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. त्यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल होणार आहे. Priyanka Gandhi Vadra

गलवान संघर्ष दरम्यान राहुल गांधींनी भारत आणि चीन यांच्या संबंधाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. चीनने भारताचे 2000 वर्ग किलोमीटर भूमी बळकावली. त्यावेळी सरकार काय झोपले होते का?, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींच्या वक्तव्यावर लखनऊ न्यायालयात केस दाखल झाली. लखनऊ न्यायालयाने त्यांना समन्स बजावले. त्या विरोधात राहुल गांधी सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींचे कामे उपटले. चीनने भारताची 2000 वर्ग किलोमीटर भूमी बळकावली, असे तुम्ही म्हणताय, तुम्ही प्रत्यक्ष तिथे होतात का?, तुमच्याकडे काय पुरावा आहे?, सच्चा भारतीय असली वक्तव्ये करून सैन्यदलाचे मनोबल घटवणार नाही अशा शब्दांमध्ये न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना फटकारले.

मात्र, त्याविषयी शरम वाटून स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी राहुल गांधींच्या भगिनी खासदार प्रियांका गांधी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवरच भडकल्या. खरा किंवा खोटा भारतीय कोण?, हे न्यायाधीश ठरवू शकत नाहीत, असे म्हणाल्या. राहुल गांधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत. ते सरकारला प्रश्न विचारतात पण सरकार संसद चालूच देत नाही. राहुल गांधींनी प्रश्न विचारलेले सरकारला आवडत नाही म्हणून सरकार कुणा मार्फत असला प्रकार करते. न्यायपालिकेविषयी आदर बाळगून सुद्धा मी असे म्हणेन खरा आणि खोटा भारतीय कोण हे न्यायाधीश ठरवू शकत नाहीत, अशा शब्दांमध्ये प्रियांका गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवर आगपाखड केली.

याच मुद्द्यावरून प्रियांका गांधी यांच्या विरोधात काही वकील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. प्रियांका गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना कोर्टाची अवमानना केली. राहुल गांधी यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने नेमके काय म्हटले याची व्यवस्थित दखल न घेता कोर्टाविरुद्ध अनेक वक्तव्ये केली. ती सहन करायचे काहीच कारण नाही म्हणून त्यांच्या विरोधात कोर्टाचा हवामान केल्याची याचिका दाखल करण्याची माहिती भाजपचे खासदार मनन कुमार मिश्रा यांनी दिली.

Priyanka Gandhi Vadra, BJP MP Manan Kumar Mishra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात