2025 च्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची फलश्रुती; पहिल्यांदाच प्रियांका गांधीचे नेतृत्व राहुल गांधींवर भारी!!

नाशिक : संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने अनेक बिले मांडली आणि ती पास करून घेतली तरीसुद्धा काँग्रेसच्या दृष्टीने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची वेगळीच फलश्रुती झाली. पहिल्यांदाच प्रियांका गांधींचे नेतृत्व राहुल गांधींवर भार ठरले. काँग्रेस पक्षाच्या दीर्घकालीन राजकीय प्रवासाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घडामोड 2025 च्या अखेरीस घडली.

राहुल गांधींचे नेतृत्व संसदेत आणि संसदेबाहेर फिके पडले. त्यांनी साधारण गेल्या वर्षभरात पुढे आणलेले Vote Chori किंवा अदानींसारखे मुद्दे फारसे काही चालले नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले. संसदेत विरोधी पक्षनेते पद मिळूनही ते मोदी सरकारला गंभीर मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणावर अडचणीत आणू शकले नाहीत. त्याचबरोबर पक्ष संघटनेत सुद्धा नवे चैतन्य निर्माण करू शकले नाहीत, अशा तक्रारी अनेकांनी केल्या. पण त्या केवळ काँग्रेसनिष्ठ राजकीय विश्लेषकांनी किंवा बाहेरच्या लोकांनी करण्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर काँग्रेस अंतर्गत सुद्धा तशी कुजबूज आणि चर्चा सुरू राहिली. राहुल गांधी हे काँग्रेससाठी सहन होत नाही आणि सांगता येत नाही, असे दुखणे झाले.

– गडकरी – प्रियांका भेट

पण याच दरम्यान प्रियांका गांधी यांनी हळूहळू आपल्या भाषणांची छाप लोकसभेत पाडलेली दिसली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी वंदे मातरम आणि मनरेगा या दोन्ही मुद्द्यांवर चांगली भाषणे केली. काँग्रेसची भूमिका जोरकसपणे मांडली याबाबतीत त्या राहुल गांधी आणि गौरव गोगोई या दोन नेत्यांना सुद्धा भारी ठरल्या. कारण प्रियांका गांधी यांच्या भाषणाची दखल मोदी सरकारला घ्यावी लागली. मोदी सरकार मधले मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रियांका गांधींनी तक्रार केल्याबरोबर ते लगेच प्रियांका गांधींना भेटले. त्यांनी सांगितलेले काम जिथल्या तिथे केले, इतकेच नाही, तर नितीन गडकरींनी youtube वर बघून स्वतः केलेला पदार्थ प्रियांका गांधी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्टमंडळाला यांना खाऊ घातला. नितीन गडकरी आणि प्रियांका गांधी यांचे हे फोटो सगळीकडे व्हायरल झाले.

– मोदी + राजनाथ सिंह यांच्या समवेत हास्यविनोद

पण त्या पलीकडे जाऊन आज संसदेचे हिवाळी अधिवेशन जेव्हा संपले, तेव्हा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी बोलविलेल्या अनौपचारिक गप्पांच्या बैठकीत प्रियांका गांधी एक प्रमुख नेत्या म्हणून बसल्या. त्यांचे स्थान राजनाथसिंह यांच्या शेजारी होते. ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि प्रियांका गांधी हे एकमेकांशी हास्यविनोद करण्यात रमलेले दिसले. त्यांनी एकत्र चहापान सुद्धा केले. यावेळी मोदी सरकार मधले काही मंत्री आणि विरोधकांमधले काही खासदार सुद्धा उपस्थित होते. परंतु प्रमुख स्थानी मात्र ओम बिर्ला, मोदी, राजनाथ सिंह आणि प्रियांका गांधी हेच दिसून आले.

– राहुल जर्मनीत, मल्लिकार्जुन खर्गे गैरहजर

राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित नव्हते, हे स्वाभाविक होते, पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या बैठकीत हजर नव्हते. त्यांच्या ऐवजी प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचे प्रमुख प्रतिनिधित्व केले. त्यामुळे प्रियांका गांधींचे नेतृत्व आता काँग्रेसने टप्प्याटप्प्याने पुढे आणल्याची खूण संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिसली.

Priyanka Gandhi supersedes Rahul Gandhi in leadership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात