देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत आणि अजूनही सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईवरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोमवारी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या की, आता हवाई चप्पलवाल्यांना रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. priyanka gandhi says its difficult for people of hawai chappal to travel on road bcoz petrol diesel price hike
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत आणि अजूनही सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईवरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोमवारी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या की, आता हवाई चप्पलवाल्यांना रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे.
केंद्रावर प्रहार करताना प्रियांका म्हणाल्या, “वचन दिले होते की हवाई चप्पल असलेले लोक विमानाने प्रवास करतील. पण भाजप सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतक्या वाढवल्या आहेत की आता हवाई चप्पलवाले आणि मध्यमवर्गीय लोकांना रस्त्यावरून प्रवास करणेही कठीण झाले आहे.”
वादा किया था कि हवाई चप्पल वाले हवाई जहाज से सफर करेंगे। लेकिन भाजपा सरकार ने पेट्रोल-डीजल के दाम इतने बढ़ा दिए कि अब हवाई चप्पल वालों और मध्यम वर्ग का सड़क पर सफर करना भी मुश्किल हो गया है।#भाजपा_लाई_महंगे_दिन pic.twitter.com/f4rVkxxOOW — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 18, 2021
वादा किया था कि हवाई चप्पल वाले हवाई जहाज से सफर करेंगे।
लेकिन भाजपा सरकार ने पेट्रोल-डीजल के दाम इतने बढ़ा दिए कि अब हवाई चप्पल वालों और मध्यम वर्ग का सड़क पर सफर करना भी मुश्किल हो गया है।#भाजपा_लाई_महंगे_दिन pic.twitter.com/f4rVkxxOOW
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 18, 2021
एक दिवस आधीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. ते म्हणाले होते की, ये सभी के लिए विनाश” और “बढती किमतों” का विकास. राहुल गांधी यांनी ट्विटरवर एका मीडिया रिपोर्टला टॅग केले होते, ज्यात दावा करण्यात आला होता की जर सरकारने कर वाढवला नसता तर पेट्रोल 66 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लीटर झाले असते. सरकार कररूपी खंडणीखोरी करत असल्याचा आरोप गांधी यांनी केला. ‘कर खंडणी’ हॅशटॅग वापरून गांधींनी हिंदीमध्ये ट्विट केले.
दरम्यान, रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा 35 पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आल्या. सलग चौथ्या दिवशी 35 पैसे प्रति लिटर दरवाढीने देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी उच्चांकावर नेले. दिल्लीत पेट्रोलची किंमत 105.84 रुपये प्रति लीटरची सर्वोच्च पातळी गाठली आणि मुंबईत ती 111.77 रुपये प्रति लीटरवर पोहोचली. मुंबईत डिझेल आता 102.52 रुपये प्रति लीटर, तर दिल्लीत 94.57 रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App