विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौहार्दाचे दर्शन घडवून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज सर्वांची मने जिंकली. वयोमानामुळे थकलेल्या शरद पवार यांना शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली. पंतप्रधानांच्या या कृतीला दाद देत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसले होते. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना खुर्चीवर मदत केली. एवढंच नव्हे तर आदराने पाण्याचा ग्लास देखील भरून दिला. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Narendra Modi
या कार्यक्रमात आधी शरद पवार यांनी भाषण केलं. भाषण केल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावरील आपल्या खुर्चीवर येऊन बसले. खुर्चीवर बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: बाटलीतील पाणी ग्लासात घेऊन शरद पवार यांना दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे सर्वांनी कौतुक केलं आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
राजधानी नवी दिल्लीत आजपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. तब्बल सात दशकांनंतर नवी दिल्ली होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. मराठी साहित्य संमेलन असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मी मराठी शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App