
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षांमध्ये परफॉर्मन्सच्या आधारावर देशावर राज्य केले. पुढची 10 वर्षे देखील त्याच आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावर राज्य करतील, असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिला. रिपब्लिक भारत टीव्हीच्या समिटमध्ये ते बोलत होते.Prime Minister Narendra Modi’s rule for the next 10 years; Amit Shah’s clear defeat!!
अमित शाह यांनी या समिटमध्ये मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांमधल्या परफॉर्मन्सचा सविस्तर आढावा घेतला. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये भारताच्या राजनैतिक आणि सामाजिक आत्मोन्नतीसाठी सर्व क्षेत्रांमध्ये भरपूर प्रयत्न केले. देशामधल्या दुर्बलातल्या दुर्बल घटकापर्यंत सरकार पोहोचले. त्यामध्ये कधीच कुठला जात, धर्म, पंथ असा भेदभाव केला नाही. सरकारी योजनांचे लाभ कुठल्याही भेदभावाशिवाय सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविले. त्यामधले सगळे मध्यस्थ आणि दलाल हटवून टाकले. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर 140 कोटी जनतेचा विश्वास बसला. मोदींनी देशाची राजनैतिक व्याख्याच बदलून टाकली. ती व्याख्या त्यांनी व्यक्ती अथवा परिवार केंद्रित न ठेवता कामगिरी आधारित अर्थात परफॉर्मन्सवर आधारित केली, याकडे अमित शहा यांनी आवर्जून लक्ष वेधले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मोदींनी स्वातंत्र्य लढ्यातील सर्व योद्ध्यांना आणि सैनिकांना मानवंदना अर्पित केली. त्यामध्ये त्यांनी कुठलाही पक्षभेद केला नाही. देशाच्या जनतेसमोर स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास मोदींच्या प्रेरणेनेच जनतेसमोर आला. देशातल्या कानाकोपऱ्यातून, सर्व दिशांमधून स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान होते, त्या सर्वांची माहिती देशाला झाली, इतकेच नाही तर देशाने स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षांत गाठलेल्या प्रगतीची प्रसाद चिन्हे देखील मोदींच्या प्रेरणेने जनतेसमोर आली, असे अमित शाह यांनी सांगितले
"For next 10 years it will be PM Narendra Modi only" says Home Minister Amit Shah, stressing on politics of performance
Read @ANI Story | https://t.co/K8SRgafvFL#AmitShah #PMModi #Delhi pic.twitter.com/AdACr7VwvO
— ANI Digital (@ani_digital) March 7, 2024
मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये उत्तम परफॉर्मन्सच्या आधारे देशावर राज्य केले आणि पुढची 10 वर्षे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परफॉर्मन्स आधारे भाजप देशावर राज्य करेल, असा निर्वाळा अमित शहा यांनी दिला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा जनादेश मागत आहे. अब की बार 400 पार ही मोदींनी घोषणा देऊन प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे अर्थातच देशाच्या जनतेने भाजपला पूर्ण बहुमत दिले, तर मोदीच पंतप्रधान पुन्हा होणार हे निश्चित आहे. पण अमित शाह यांनी केवळ पुढच्या 5 वर्षांसाठी नाही, तर पुढच्या 10 वर्षांसाठी मोदी पंतप्रधान असतील, असा स्पष्ट निर्मला दिल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदींनी अलिखित नियम करून भाजपमध्ये 75 वर्षांचा वरच्या नेत्यांना निवृत्त केले होते. मोदी स्वतः 2025 मध्ये 75 वर्षांचे होणार आहेत, अशा वेळी ते स्वतः पंतप्रधान राहतील की अन्य कुठल्या भूमिकेत शिरतील??, याविषयी देशाच्या सर्व राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी परफॉर्मन्सच्या आधारे पुढची 10 वर्षे मोदीच देशावर राज्य करतील, असा निर्वाळा देऊन मोदींचे पुढचे 10 वर्षांचे व्हिजन जनतेसमोर आणले आहे. याला विशेष महत्त्व आहे!!
Prime Minister Narendra Modi’s rule for the next 10 years; Amit Shah’s clear defeat!!
महत्वाच्या बातम्या
- जुल्फीकार अली भुट्टो गेले जीवानिशी; 44 वर्षांनी पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने चुकीची ठरवली फाशी!!
- जरांगेंचे आंदोलन + वंचितच्या सूचनांवर महाविकास आघाडीचे नेते गप्प; वंचितच्या नेत्याकडूनच आघाडीची बैठक “एक्सपोज”!!
- शहाजहान शेखला CBI कोठडी, वैद्यकीय तपासणीनंतर CIDच्या ताब्यात!
- खासदार नवनीत राणांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी!