विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : चित्रपटांमध्ये पोलिसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवली जाते, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. या कोरोनाच्या काळात पोलिसांचा मानवी चेहरा सर्वांसमोर आला असल्याच्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.Prime Minister Narendra Modi’s grief over misrepresentation of police in films
पंतप्रधान मोदी हे नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदी यांनी पोलिसांनी कोरोना महामारीत केलेल्या कामाची आठवण काढली. ते म्हणाले की, पण सोशल मीडियावर आपण पाहिलं की पोलिसांनी कोरोनाच्या काळात एवढी चांगली कामगिरी केली की त्यांचा फोटो व्हायरल झाले. त्यांनी गरजूना औषधे, अन्न पोचवले.
या कोरोनाच्या काळात पोलिसांचा मानवी चेहरा सर्वांसमोर आल्याचं त्यांनी सांगितलं गणवेशातीलील अनेक पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्न आणि औषधे पोहचवल्याचे सर्वांनी पाहिले.पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेतील भरतीमध्ये सुधारणांची गरज होती. दुदैर्वाने आम्ही मागे राहिलो.
पोलिसांबद्दल एक समज आहे-त्यांच्यापासून दूर रहा, लष्कराबाबतही तेच खरे नाही. पोलिसांचे मनुष्यबळ अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की ते लोकांशी सौहार्दपूर्ण वर्तन करतील. सुरक्षा यंत्रणांमध्ये तंत्रज्ञान हे आता एक संभाव्य शस्त्र बनले आहे. सुरक्षा दलात राहण्यासाठी केवळ शारीरिक प्रशिक्षण पुरेसे नाही, आता विशेष दिव्यांग व्यक्तीही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसतानाही सुरक्षा क्षेत्रात योगदान देऊ शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App