वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष ठरलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिर परिसरातील तीन अतिभव्य प्रकल्पांचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे.Prime Minister Narendra Modi Will inaugurates the three projects in Somnath temple area tomorrow
सोमनाथ मंदिराशी सलग्न असलेले हे प्रकल्प आहेत. समुद्र पथ दर्शन, सोमनाथ मंदिराचा इतिहास सांगणारे वास्तुसंग्रहालय आणि अहिल्याबाई मंदिराचा जीर्णोद्धार अशा तीन प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. त्या बरोबर पार्वती माता मंदिराचा शिलान्यासही ते करणार आहेत. कोरोनामुळे हा कार्यक्रम ऑनलाइन व वर्चुअल स्वरूपामध्ये होणार आहे. गृहमंत्री अमित शाह कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हे सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष तर गृहमंत्री अमित शाह सोमनाथ ट्रस्टचे सदस्य आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला अधिक उंची मिळाली आहे.
समुद्र आणि शिवपूरणातील चित्रे पहा
समुद्र दर्शन पथ योजनेसाठी ४७ कोटी खर्च केले आहेत. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘ प्रसाद’ योजनेअंतर्गत हा निधी दिला आहे. समुद्र किनारी दीड किलोमीटर लांब आणि २७ फूट रुंदीचा रस्ता तयार केला आहे. तसेच तेथे एक भिंत उभारली असून त्यावर शिवपुरणातील चित्रे रेखाटली आहेत. पर्यटक समुद्र दर्शनाचा लाभ घेण्याबरोबर ही चित्रे पाहण्याचा आनंदही ते लुटू शकतील. त्याबरोबर सोमनाथ मंदिराची भव्यताही ते पाहू शकतील. समुद्र दर्शन पथावर लहान मुले सायकलची रपेट मारू शकणार आहेत.
सोमनाथ मंदिर प्रांगणात वास्तुसंग्रहालय
सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा अनेक मूर्ती त्यातून निघाल्या. या सर्व मूर्तींचे जतन करण्यासाठी एक संग्रहालय तयार केले आहे. त्याचे लोकार्पण मोदी करणार आहेत. त्यात सोमनाथ मंदिराचा इतिहास, वास्तुशिल्प और धार्मिक महत्व आणि मंदिरातील शिल्पांची माहिती देण्यात आली आहे.सोमनाथ एक्जिहिबिशन गैलरी असे त्याचे नामकरण केले आहे. त्यासाठी ४५ कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय पार्किंग और सॉलिड वेस्ट मैनेजमेंटची व्यवस्था केली आहे. त्याचा पर्यटकांना मोठा लाभ होणार आहे. बारा ज्योतिर्लिंगमध्ये सोमनाथचे पाहिले स्थान असून हिंदूंची अपार श्रद्धा त्यावर आहे.
अहिल्याबाई मंदिराचा जीर्णोद्धार
जुने सोमनाथ मंदिर म्हणून नावलौकिक असलेले आणि इंदूरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. १७८३ ते १७८७ या काळात हे मंदिर अहिल्याबाई यांनी बांधले होते. त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सोमनाथ ट्रस्टने या मंदिरासाठी साडेतीन कोटी दिले होते.
पार्वती मंदिरासाठी ३० कोटी खर्च होणार
शिव भक्त मोदी यांच्या हस्ते पार्वती मंदिराचा शिलान्यास होणार आहे. सोमनाथ मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. पण, पर्वतीशिवाय शिवाची कल्पना करता येत नाही. त्यामुळे पार्वती मातेचे मंदिर बांधण्यात येत आहे. या मंदिराचा सर्व खर्च हा लोकवर्गणीतून होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App