विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर येथील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘लोकसभा निवडणूक ही स्थिरता आणि अस्थिरता यांच्यातील निवडणूक आहे. एका बाजूला भाजप आणि एनडीए आहेत ज्यांचे ध्येय देशासाठी कठोर आणि मोठे निर्णय घेणे आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि इंडी यांची आघाडी आहे, ज्यांचा एकच मंत्र आहे, जिथे सत्ता मिळेल तिथे भरपूर मलई खा.’ Prime Minister Narendra Modi criticizes India Aghadi from a Rally in Chandrapur
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशातील दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि गरीब लोक मोदी सरकारला आपले सरकार मानतात. मोदी राजघराण्यात जन्म घेऊन पंतप्रधान झाले नाहीत. गरीब कुटुंबात जन्म घेऊन, तुमच्यामध्ये राहून मोदी इथे आले आहेत. जनतेचे प्रश्न सोडवणे ही राजकीय पक्षांची जबाबदारी आहे, पण काँग्रेस पक्षच समस्यांची जननी आहे.
मागील 10 वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. तुम्ही एनडीएला पूर्ण बहुमत दिले. देशातील प्रमुख समस्यांवर आम्ही कायमस्वरूपी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. कडू कारलं तुपात तळून घ्या किंवा साखरेत घोळून घ्या, तरीही ते कडू ते कडूच राहते. ही म्हण काँग्रेसला तंतोतंत लागू पडते. काँग्रेस कधीही बदलू शकत नाही. असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहोत. चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-एनडीएच्या मेहनती उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनतेमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App