‘’जनसंघ आणि भाजपला नेस्तनाबूत करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण…’’ पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात!

PM Modi New

‘’भाजपा एक व्यवस्था आहे, भाजपा एक कल्पना आहे, भाजपा एक संघटना आहे, भाजपा एक चळवळ आहे.’’, असंही मोदींनी म्हटलं आहे.

प्रतिनिधी

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाचे (विस्तार) उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भाजपाच्या निवासी संकुल आणि सभागृहाचे उद्घाटनही केले. पंतप्रधानांनी भाषण करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. केंद्रीय यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि न्यायालयाचे निर्णयावर संशय व्यक्त केल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली. मोदी म्हणाले की, ‘’आज तपास यंत्रणांची चौकशी केली जात आहे, भ्रष्टाचाऱ्यांची मुळं हादरली आहेत. सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचाराविरोधात मोहीम राबवली तर काही पक्षांनी भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.’’ Prime Minister Narendra Modi criticism of the opposition at the inauguration of the BJP headquarters in Delhi

काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘’आमचे सरकार भ्रष्टाचारावर सातत्याने कारवाई करत आहे. त्यामुळेच सर्व भ्रष्ट लोक एका व्यासपीठावर येऊ लागले आहेत. काँग्रेसच्या राजवटीत काही लोकांनी बँकांची प्रचंड लूट केली. आज भाजपा सरकारने या लोकांची सुमारे २० हजार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. भाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचाराने घेरलेल्या शेकडो अधिकाऱ्यांना घरी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भ्रष्टाचाराला असा चाप बसत आहे. भाजपाला प्रत्येक पावलावर भ्रष्टाचाराचा मुकाबला करायचा आहे, भाजपाला प्रत्येक पावलावर घराणेशाहीचा मुकाबला करायचा आहे, भाजपाला प्रत्येक जागोजागी भारतविरोधी शक्तींशी मुकाबला करायचा आहे. १९८४ मध्ये आमचे फक्त दोन खासदार होते पण आम्ही खचलो नाही आणि निराश झालो नाही. आम्हाला इतर कोणाचा दोष आढळला नाही. आम्ही आमचे संघटन मजबूत केले, तेव्हाच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत.”

सावरकर मुद्द्यावर बॅकफूट वर गेलेली काँग्रेस आता लोकसभा अध्यक्षांविरुद्ध फ्रंटफूट वर!!; आणणार अविश्वास ठराव

याचबरोबर, ”काँग्रेस नेते एकेकाळी जनसंघाला उखडून फेकून देऊ असे म्हणायचे. आजची काँग्रेस म्हणते- मोदी, तुमची कबर खोदली जाईल. जनसंघ आणि भाजपाला नेस्तनाबूत करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते पूर्णपणे अयशस्वी झाले. तसेच, लोकसभेच्या दोन जागांपासून सुरू झालेला प्रवास २०१९ मध्ये ३०३ जागांवर पोहोचल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. अनेक राज्यांमध्ये आपल्याला ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळतात. आज भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्षच नाही तर भारतातील सर्वात भविष्यवादी पक्ष आहे. आमचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे भविष्यातील आधुनिक आणि विकसित भारत घडवणे.’’ असंही मोदींनी सांगितलं.

https://youtu.be/gCq7O6PmOEg

याशिवाय, ‘’आजपासून काही दिवसांनी आपला पक्ष ४४ वा स्थापना दिवस साजरा करणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हा प्रवास एक अथक आणि अखंड प्रवास आहे, हा प्रवास प्रयत्नांच्या पराकाष्टेचा प्रवास आहे. हा प्रवास समर्पणाच्या आणि संकल्पाच्या शिखराचा प्रवास आहे. हा प्रवास म्हणजे विचार आणि वैचारिक विस्ताराचा प्रवास आहे. भाजपा एक व्यवस्था आहे, भाजपा एक कल्पना आहे, भाजपा एक संघटना आहे, भाजपा एक चळवळ आहे.’’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

Prime Minister Narendra Modi criticism of the opposition at the inauguration of the BJP headquarters in Delhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात