विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Prime Minister Narendra Modi’ आगामी सणासुदीच्या काळात भारतीय वस्तूंना प्राधान्य देऊन देशी उद्योगांना बळकटी मिळवून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Prime Minister Narendra Modi’
एनडीए खासदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात ‘स्वदेशी मेळे’ आयोजित करावेत. यामधून स्थानिक उत्पादक, कारागीर, लघुउद्योग, महिला स्वयं-सहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.Hazratbal
मोदी म्हणाले की, दिवाळी, दसरा, नवरात्र यांसारख्या सणांदरम्यान आयात केलेल्या वस्तूंची विक्री प्रचंड वाढते. पण जर ग्राहकांनी ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांना पाठिंबा दिला तर केवळ देशी वस्तूंना चालना मिळणार नाही तर ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार व उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. “मेड इन इंडिया ही केवळ सरकारी योजना नसून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठीची लोकचळवळ आहे,” असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले.
यावेळी जीएसटी 2.0 चा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की नवीन कररचना अधिक पारदर्शक आणि उद्योगस्नेही केली जात आहे. यामुळे लघुउद्योगांना दिलासा मिळेल, करप्रणालीतील गुंतागुंत कमी होईल आणि ग्राहकांनाही वाजवी दरात वस्तू उपलब्ध होतील. “करसुलभता आणि व्यापारस्नेही वातावरण ही देशाच्या आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे,” असे ते म्हणाले.
मोदी यांनी खासदारांना निर्देश दिले की, स्वदेशी मेळ्यांमध्ये हातमाग, हस्तकला, खेळणी उद्योग, सजावटीच्या वस्तू, कृषी उत्पादनं यांना प्राधान्य द्यावे. शेतकरी व महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थान मिळवून द्यावे. तरुणाईला या चळवळीत सामील करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत जनजागृती कार्यक्रम राबवावेत.
मोदी म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी भारतीय उद्योगांनी ग्राहकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिल्यास भारताचा ब्रँड मजबूत होईल आणि निर्यातीतही वाढ होईल. “स्वदेशी वस्तूंवर अवलंबून राहणे म्हणजे केवळ देशभक्ती नाही, तर ते आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App