‘हर घर तिरंगा’ अभियानावर पंतप्रधान मोदींचे ट्विट, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीयांना विशेष आवाहन, म्हणाले…

7 political parties in Sri Lanka seek help from Prime Minister Modi, urge implementation of 13th Amendment to the Constitution of Sri Lanka, read more

‘हर घर तिरंगा’ अभियानाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी ऊर्जा भरली आहे, असंही मोदींनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (11 ऑगस्ट) ‘हर घर तिरंगा मोहिमे’अंतर्गत देशवासियांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले. ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरी तिरंगा सन्मानाने फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. Prime Minister Modis tweet on the Har Ghar Tiranga campaign made a special appeal to citizens on the occasion of Independence Day

पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,, ‘तिरंगा हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. तिरंग्याशी प्रत्येक भारतीयाचे भावनिक नाते आहे. हा आपल्याला राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करतो. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे माझे आवाहन आहे.

याचबरोबर, ‘हर घर तिरंगा’ अभियानाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी ऊर्जा भरली आहे. देशवासियांना यंदा ही मोहीम एका नव्या उंचीवर न्यायची आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशाच्या अभिमानाचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज फडकावू या. तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी https://harghartiranga.com वर अपलोड करा. असंही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना घरोघरी तिरंगा फडकावा, असे भावनिक आवाहन केले होते. लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान केले होते. पंतप्रधान म्हणतात की या उपक्रमामागे लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना आणि लोकसहभागाची भावना बिंबवणे महत्त्वाचे आहे.

Prime Minister Modis tweet on the Har Ghar Tiranga campaign made a special appeal to citizens on the occasion of Independence Day

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*