गोदापूजन आणि काळाराम मंदिरातील पूजेत पंतप्रधान मोदींचा अखंड भारताचा संकल्प!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक मध्ये येऊन गोदावरी पूजन आणि काळाराम काळाराम मंदिरात पूजा अर्चा करताना अखंड भारताचा संकल्प सोडला. भारतीय राजकीय व्यवस्थेच्या दृष्टीने ही अनोखी घटना नाशिक मध्ये घडली. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचा संकल्प पूर्ण झाला असताना आणि तेथे श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असताना अखंड भारताचा संकल्प सोडणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोदींनी स्वीकारलेल्या राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक विचारप्रणालीशी सुसंगत आहे. Prime Minister Modi’s resolve for Akhand Bharat at Goda Pujan and worship at Kalaram Temple

गोदावरी पूजन करताना आणि काळाराम मंदिरात पूजा आणि आरती करताना पंतप्रधान मोदींना पुरोहितांनी संकल्प विचारला त्यावेळी त्यांनी लोककल्याण आणि अखंड भारताचा संकल्प यांचा उच्चार केला. काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

कोणत्याही देवतेची पूजा करताना यजमान वेदोक्त आणि पुराणोक्त संकल्प सोडतात. या संकल्पना पूर्ण करण्यात देवतांनी सहाय्य करावे, अशी प्रार्थना करतात. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संकल्प सोडताना लोककल्याण आणि जनहितार्थ अशा आशयाचे संकल्प सोडले जातात. पंतप्रधान मोदींनी लोककल्याण आणि जनहित हे संकल्प तर सोडलेच, पण त्याचबरोबर आपल्या राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक विचार प्रणालीशी सुसंगत असा अखंड भारत निर्मितीचा संकल्प पुन्हा एकदा सोडला.

1947 मध्ये झालेली देशाची फाळणी मिटावी. देश पुन्हा अखंड व्हावा. भारताची सर्वांगाने प्रगती व्हावी आणि जगात प्रबळ भारत ताठ मानेने उभारावा हा अखंड भारताचा मूळ संकल्प मोदींनी गोदापूजन आणि काळाराम मंदिरातील पूजाअर्चेच्या वेळी सोडला.

Prime Minister Modi’s resolve for Akhand Bharat at Goda Pujan and worship at Kalaram Temple

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात