शिक्षक दिनी पंतप्रधान मोदींचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद, म्हणाले…

आज संपूर्ण शिक्षक दिन  निमित्ताने प्रत्येकजण आपापल्या शिक्षकांना  शुभेच्छा देत आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज संपूर्ण देश शिक्षक दिन साजरा करत आहे. या निमित्ताने प्रत्येकजण आपापल्या शिक्षकांना  शुभेच्छा देत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशीही त्यांनी संवाद साधला आणि देश आणि जग बदलण्याची ताकद शिक्षकांमध्ये असल्याचे सांगितले. Prime Minister Modis interaction with National Award winning teachers on Teachers Day

शिक्षकांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुमच्या घरी पाहुणे येतात आणि त्यांचे पाय तुमच्या घरी पडतात, तेव्हा ते देवाचे रूप असते, असे येथे म्हटले जाते. तुम्ही माझे पाहुणे आहात आणि तुमची उपस्थिती आज माझ्या घरी आहे, मी खूप भाग्यवान आहे. इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

पर्यावरणाबाबत एका शिक्षकाच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या देशातील प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करणे आपल्या संस्कृतीत आहे. पूर्वी असे असायचे की कपडे जुने झाले की मोठ्या भावाचे कपडे धाकट्या भावाला दिले जायचे, आणि ते घालण्या  योग्य राहत नव्हते   तेव्हा रजाईसारख्या वस्तू बनवल्या जायच्या.

Prime Minister Modis interaction with National Award winning teachers on Teachers Day

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात