प्रयागराजमध्ये तब्बल 15 लाख जणांनी केले गंगेत स्नान . Prime Minister Modi wished the countrymen on Vasant Panchami
देशभरात वसंत पंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या शुभमुहूर्तावर प्रयागराजमध्ये गंगेत स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने बुद्धिमत्ता, ज्ञान आणि कला वाढते. ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले, “देशभरातील माझ्या कुटुंबियांना वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेच्या शुभेच्छा.”
बुधवारी, वसंत पंचमी निमित्त प्रयागराज शहरात माघ मेळ्याच्या चौथ्या स्नान पर्वावर, सुमारे 15 लाख लोकांनी ‘हर हर गंगे’च्या जयघोषात सकाळी 8 वाजेपर्यंत गंगा आणि पवित्र संगमात श्रद्धेने स्नान केले.
प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळपासून ढगाळ आकाश आणि मंगळवारी पावसानंतर थंडीचे वातावरण असूनही बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सुमारे 14 लाख 70 हजार लोकांनी गंगा आणि संगमात स्नान केले. माघमेळा परिसरात पहाटेपासूनच लोक आंघोळीसाठी येत असून त्यात महिला, लहान मुले व वृद्धांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App