‘या’ दिवशी बंगालचा दौरा करणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. जिथे ते संदेशखळी येथील पीडित महिलांची भेट घेणार आहेत. संदेशखळी येथील महिलांच्या कथित छेडछाडीचे प्रकरण अजूनही शांत झालेले नाही. भाजपासोबतच विरोधी पक्षही ममता बॅनर्जी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. Prime Minister Modi will meet the victims of Sandeshkhali
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालला जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे ते संदेशखळी येथील पीडित महिलांची भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचे तसेच लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.
संदेशखळी येथील महिलेचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपा, काँग्रेस आणि डाव्यांच्या अनेक नेत्यांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला बंगाल प्रशासनाने विरोधी पक्षनेत्यांना संदेशखळीत जाऊ दिले नाही, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी संदेशखळी येथे जाऊन स्थानिक नागरिकांची भेट घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App