प्रतिनिधी
नवसारी : Prime Minister Modi मी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. कारण माझ्या खात्यात एवढ्या माता-भगिनींचा आशीर्वाद आहे. हाच आशीर्वाद माझी शक्ती, संचित आणि सुरक्षा कवच आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.आंतरराष्ट्रीय महिलादिनी गुजरातच्या नवसारी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.Prime Minister Modi
माेदींनी लखपती दीदींशी संवाद साधला. कार्यक्रमाला दीड लाखाहून जास्त महिलांनी हजेरी लावली होती. देशभरात महिलांच्या भागीदारीबद्दल मोदी म्हणाले, आज संसदेत ७४ महिला खासदार आहेत. जिल्हा न्यायालयांत महिलांचा सहभाग ३५ टक्क्यांहून जास्त आहे. अनेक राज्यांत दिवाणी न्यायाधीशांच्या नियुक्तींमध्ये ५० टक्के आपल्या मुली आहेत. या कार्यक्रमासाठी २५०० महिला पोलिस तैनात होत्या. म्हणून ते अनोखे ठरले.
महिला दिनानिमित्त मध्य प्रदेशातील सागरच्या शिल्पी सोनी यांनी पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकाउंटची सूत्रे घेतली. अकाउंटवर त्यांनी विशेष अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, इस्रोमध्ये एक चांगली गोष्ट आहे. तेथे काचेचे छत नाही. सर्वांसाठी विशाल संधी आहे. तुम्ही पंख कसे फैलावून कधी झेप घेता हे स्वत:वर अवलंबून आहे. शिल्पी स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी चांद्रयानसह ३५ हून जास्त मोहिमांत महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
बिहारच्या नालंदामधील अनंतपूरच्या मशरूम लेडी अनितादेवी यांनी पंतप्रधानांच्या एक्स अकाउंटची जबाबदारी घेतली होती. त्यावरून त्यांनी जीवनातील संघर्ष सांगितला. स्वत: च्या पायावर उभे राहण्याचे माझ्या मनात होते. २०१६ मध्ये माधोपूर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना केली. मशरूम उत्पादनात आत्मनिर्भर झाले. महिला आत्मनिर्भर झाली तर समाज आत्मनिर्भर होत असतो. मी हे करून दाखवू शकले तर मग तुम्हीदेखील हे करू शकता. अनिता मशरूमचे उत्पादनच नव्हे तर त्याचे बीजही तयार करू लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App