प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता वितरित; ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२००० कोटी रुपये जमा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूर इथल्या कार्यक्रमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १९व्या हप्त्याचे ऑनलाईन पद्धतीने वितरण केले. यावेळी देशभरातील ९.८ कोटींहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सुमारे ₹२२ हजार कोटींपेक्षा अधिक सन्मान राशी थेट हस्तांतरित करण्यात आली. या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून उपस्थित होते.

या राजस्तरीय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पिक स्पर्धेतील शेतकरी आणि प्रगत एफपीसी/पीएमएफएमई उद्योजकांचा सत्कार केला.

सत्कार करण्यात आलेले पीक स्पर्धेतील शेतकरी आणि उद्योजक :

– पितांबर घुमडे, कृषीउन्नोती फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., वायगाव, ता. समुद्रपूर जि. वर्धा
– सविता महादेव जुंगरे, तेजस्विनी वुमन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., हमदापूर. ता. सेलू जि. वर्धा
– कमलेश भोयर, कन्हान अ‍ॅग्रो व्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी, ता. पारशिवनी, जि. नागपूर
– इकबाल गफ्फार बराडे, निशिगंधा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. पाटण सावंगी, ता. सावनेर जि. नागपूर
– प्रमोद सोनकुसरे, कोदुर्ली, ता. पवनी, जिल्हा भंडारा
– पवन कटनकर, तुमसर फार्मर प्रोड्युसर कंपनी, सिहोरा, ता. तुमसर, जि. भंडारा
– सुरेंद्र बिसेन, पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी. लि., कुऱ्हाडी, ता. गोरेगाव जि. गोंदिया
– अरुण कवडुजी केदार, शेगाव खुर्द. ता. भद्रावती जि. चंद्रपूर
– हरिचंद्र अनंतराव कोडापे, चक खापरी. ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर
– यशवंत संभाजी सायरे, कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. चिनोरा ता. वरोरा, जि. चंद्रपूर
– विनय विजय साळवे, मु. काकडयेली पो. दूधमाळा ता. धानोरा. जि. गडचिरोली
– हिटलर रवींद्र गिरडकर, मु. नवेगाव पो. मुडझा, ता. जि. गडचिरोली

Prime Minister Modi releases 19th installment of Kisan Samman Nidhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात