पंतप्रधान मोदींचे अबुधाबीत ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भव्य स्वागत

UAE च्या राष्ट्रपतींनी घेतील गळाभेट


विशेष प्रतिनिधी

अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीला पोहोचले आहेत. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी पंतप्रधान मोदींचे आलिंगन देऊन स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.Prime Minister Modi received grand welcome in Abu Dhabi by ‘Guard of Honour’



ते 14 फेब्रुवारी रोजी अबुधाबीमध्ये BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील, परंतु त्याआधी आज म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी ते अबुधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये भारतीय नागिरकांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला अहलान मोदी (हॅलो मोदी) असे नाव देण्यात आले आहे. 2015 पासून पीएम मोदींचा यूएईचा हा सातवा दौरा आहे. गेल्या आठ महिन्यांतील त्यांचा हा तिसरा यूएई दौरा असेल.

आज अबुधाबीमध्ये प्रवासी हिंदूंना संबोधित करण्यापूर्वी मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली. ते म्हणाले, ‘आमच्या परदेशी भारतीयांचा आणि जगाशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे. आज संध्याकाळी, मी अहलान मोदी कार्यक्रमात UAE मधील भारतीय नागरिकांना भेटण्यास उत्सुक आहे. या अविस्मरणीय क्षणात नक्की सहभागी व्हा. तसेच, 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटनापूर्वी सोशल मीडियावर BAPS हिंदू मंदिराची एक झलक दाखवण्यात आली आहे.

Prime Minister Modi received grand welcome in Abu Dhabi by ‘Guard of Honour’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात