पंतप्रधान मोदींनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची घेतली भेट, म्हणाले…

”तुमच्या मेहनतीने आणि यशामुळे देशात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.”, असंही मोदींनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (10 ऑक्टोबर 2023) आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. Prime Minister Modi met the athletes participating in the Asian Games

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व खेळाडूंनी दाखवलेले शौर्य, त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांनी दिलेले परिणाम यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोषाचे वातावरण आहे. 100 पदकांचा टप्पा पार करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली.

याचबरोबर खेळाडूंशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “१४० कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. तुमच्या मेहनतीने आणि यशामुळे देशात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.”

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा संबंध पंतप्रधानांनी देशाच्या यशाशी जोडला. ते म्हणाले, “आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकतालिका देशाचे यश दर्शवते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे आणि आपण योग्य मार्गावर जात आहोत याचे मला वैयक्तिक समाधान आहे.”

आशियाई क्रीडा स्पर्धेतील तुमच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत असल्याचेही मोदींनी म्हटले. तसेच, पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या वतीने मी सर्व खेळाडूंचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी खेळाडूंच्या भावी पिढ्यांसाठी मार्ग मोकळा केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.”

Prime Minister Modi met the athletes participating in the Asian Games

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात