विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रभावशाली लोकांची यादी टाईम साप्ताहिकाने जारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सिरम इंन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांच्या नावाचा सामावेश आहे.Prime Minister Modi, Adar Poonawala and Mamata Banerjee are also among the 100 most influential people in the world
पंतप्रधान मोदी यांच्या प्रोफाइलमध्ये सांगण्यात आले आहे की, भारतात लोकशाहीच्या स्थापनेनंतर गेल्या ७४ वर्षामध्ये ३ प्रमुख नेते राहिले आहेत. यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा सामावेश आहे. भारताच्या राजकारणावर सर्वात जास्त प्रभाव असणारे नेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
२०२१1 मधील सर्वात प्रभावशाली १०० लोकांची यादी जारी करण्यात आली. नेत्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिंस हॅरी आणि मेगन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव या यादीत आहे.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत लिहिले आहे की, त्या भारतीय राजकारणातील कणखर चेहरा आहेत. त्या फक्त आपल्या पक्षाचे नेतृत्वच नाही करीत तर स्वत: एक पक्ष आहेत. त्यांनी देशातील रस्त्यांवर उतरून लढाईच्या भावनेला मजबूती दिली. तसेच पितृसत्तात्मक संस्कृतीला आव्हान दिले.
कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणारे सीरम इंन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांना देखील प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान देण्यात आले आहे. सीरम ही जगातील सर्वात मोठी लस बनवणारी कंपनी आहे
त्यामुळे कोरोनाच्या नायनाटासाठी सीरमची भूमिका मोठी असल्याचे म्हटले आहे. या तालिबानी नेता मुल्ला बरादर याचेही नाव आहे. तालिबान सरकारमधील सर्वात मोठा चेहरा असून सर्व महत्वाचे निर्णय तोच घेतो असे यामध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App