विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांचा दौरा केला. याची माहिती निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन तपशीलवार दिली, पण निवडणुकीच्या तारखांची घोषणा मात्र योग्य वेळी करू, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केले.
महाराष्ट्राच्या दौऱ्यात दोन दिवसांपासून राजकीय पक्षांशी चर्चा झाली. सण, उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. आम्ही 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली. पैशांची ताकद रोखण्याची विनंती काही पक्षांनी केली. पोलिंग स्टेशन दूर आहेत. वृद्धांना येण्याजाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी केली, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
पोलिंग एजंट त्याच मतदारसंघाचा असावा अशी काही पक्षांनी विनंती केल्याच निवडणूक आयोगाने सांगितलं. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्याची मागणीही पक्षांनी केली. फेक न्यूज रोखण्याची मागणी त्यांनी केली. फेक न्यूज कसे रोखणार याची माहिती आम्ही दिली, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या किती आहे? SC, ST मतदारसंघ किती आहेत? पुरुष, महिला मतदारांची संख्या किती? 85 वर्षावरील मतदार किती आहेत? त्याची माहिती दिली.
विधानसभा निवडणूक माहिती
महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण मतदारसंघ : 288
SC 29 आणि ST 25 मतदारसंघ.
चालू विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्याआधी विधानसभा निवडणूक घ्यावी लागणार.
महाराष्ट्रात एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या 9.59 कोटी.
पुरुष मतदारांची संख्या 4.59 कोटी आणि महिला मतदारांची संख्या 4.64 कोटी.
तृतीयपंथीय मतदारांची संख्या 6000.
वय वर्ष 85 च्या पुढे असलेल्या मतदारांची संख्या 12.48 लाख.
पहिल्यांदाच मतदान करणारे 19.48 लाख मतदार.
1 लाख 186 पोलिंग स्टेशन
9 लाख नवीन महिला मतदार.
महाराष्ट्रात महिला मतदार वाढवण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
शहरी विभागात 100 % बुथवर सीसीटीव्ही लावण्यात येणार
ग्रामीण भागात 50 % बुथवर सीसीटीव्ही लावण्यात येणार.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App