NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालदा दंगल पीडित महिलांचे दुःख जाणून घेऊन त्यांना देणार आधार!!

Vijaya Rahatkar

वृत्तसंस्था

कोलकाता : NCW अर्थात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आल्या असून मुर्शिदाबाद, जंगीपूर, मालदा इथल्या दंगल पीडित महिलांचे दुःख जाणून घेऊन त्यांना आधार देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या करणार आहेत. प्रत्यक्ष दंगलग्रस्त भागात जाऊन महिलांचे दुःख जाणून घेऊन त्यांच्यातली भीती दूर करण्याचे प्रयत्न आम्ही करू. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकारकक्षेत येणाऱ्या सर्व उपाययोजनांनी दंगल पीडित महिलांची मदत करू, असे आश्वासन विजयाताई रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पश्चिम बंगालमधल्या धर्मांध मुस्लिमांनी waqf सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये ठिकठिकाणी आंदोलने केली त्याचे पडसाद मुर्शिदाबाद, जंगीपूर या जिल्ह्यांमध्ये उमटले. तिथे धर्मांध मुस्लिमांनी पोलिसांवर हल्ले केले. वाहने आणि दुकानांची जाळपोळ करून महिलांवर अत्याचार केले. तिथल्या हिंदू समाजाला भयभीत करून पलायन करायला भाग पाडले. या हिंसक घटनांचा देशभर निषेध झाला.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाने बंगाल मधल्या महिलांवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेऊन त्या घटनांच्या चौकशी आणि तपासासाठी विशेष समिती नेमली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी दिवसांचा बंगाल दौरा आखून आजपासून त्यांनी तो दौरा सुरू केला. या दौऱ्यात मालदा इथल्या शरणार्थी शिबिराला भेट देणार असून तिथल्या दंगल पीडित महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करतील. या महिलांची भीती दूर करून त्यांना आधार देतील.

महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी राष्ट्रीय महिला आयोग नेहमीच पुढाकार घेत आलाय. बंगाल मधल्या दंगल पीडित महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी राष्ट्रीय महिला आयोग आपल्या अधिकारकक्षेतील सर्व उपाययोजनांचा अवलंब करून संबंधित महिलांची सुरक्षा आणि सन्मान राखेल, असे आश्वासन विजयाताई रहाटकर यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात