आपल्या जन्मस्थळी पोहोचून भावुक झाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जन्मभूमीवर नतमस्तक, कपाळावर लावली माती

President Ram Nath Kovind Kovind kanupr visit, Also Visited Birthplace Paraunk Village

President Ram Nath Kovind Kovind  : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते आपल्या जन्मगावी पारुंखमध्ये दाखल झाले. तेथे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपति कोविंद यांनी हेलिपॅडमधून उतरताच आपले जन्मगाव पारुंखची माती कपाळाला लावून जन्मभूमीला वंदन केले. President Ram Nath Kovind Kovind kanupr visit, Also Visited Birthplace Paraunk Village


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते आपल्या जन्मगावी पारुंखमध्ये दाखल झाले. तेथे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपति कोविंद यांनी हेलिपॅडमधून उतरताच आपले जन्मगाव पारुंखची माती कपाळाला लावून जन्मभूमीला वंदन केले.

राष्ट्रपतींनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि मिलन केंद्र व वीरांगना झलकारी बाई इंटर कॉलेजला भेट दिली. येथे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, ‘माझ्या स्वप्नामध्येसुद्धा मी कधी कल्पना केलेली नव्हती की माझ्यासारख्या गावातल्या एका सामान्य मुलाला देशातील सर्वोच्च पदाची जबाबदारी पार पाडण्याचा बहुमान मिळेल. पण आमच्या लोकशाही व्यवस्थेने हे करून दाखवले आहे. आज या निमित्ताने मी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांना त्यांच्या अमूल्य त्याग आणि योगदानाबद्दल नमन करतो. खरंच मी आज जिथे पोहोचलो आहे, त्याचं श्रेय या खेड्याच्या मातीला आणि या प्रदेशातील आणि आपणा सर्वांच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाला आहे.

राष्ट्रपती म्हणाले, भारतीय संस्कृतीत मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव या गोष्टी शिकवल्या जातात. आमच्या घरातही हाच धडा शिकवला जात होता. आपल्या ग्रामीण संस्कृतीत पालक आणि गुरू व वडीलजनांचा आदर अधिक स्पष्टपणे दिसून येतो. माझ्या कुटुंबात अशी परंपरा आहे की, त्यांनी गावातली सर्वात वयोवृद्ध महिलेला आई आणि बुजुर्ग पुरुषाला वडिलांच्या स्थानी मानण्याचे संस्कार आहेत. मग ते कोणत्याही वर्णाचे किंवा पंथाचे असो. आज मला हे पाहून आनंद होत आहे की, आमच्या कुटुंबातील वडीलजनांचा आदर करण्याची ही परंपरा अजूनही सुरू आहे.

President Ram Nath Kovind Kovind kanupr visit, Also Visited Birthplace Paraunk Village

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात