विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : सोमवारी देशाच्या प्रथम नागरिक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीर्थराजच्या पवित्र भूमीवर पोहोचून संगमात पवित्र स्नान केले. राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विमानतळावर पोहोचले. यानंतर दोघेही संगम क्षेत्रात पोहोचले. त्या आज आठ तासांपेक्षा जास्त काळ संगम शहरात असतील.
राष्ट्रपतींनी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर श्रद्धेचे स्नान करून, सनातन श्रद्धेला एक मजबूत पाया घातला. देशाच्या प्रथम नागरीक संगमात पवित्र स्नान करण्याचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यानंतर, त्यांची धार्मिक श्रद्धा आणखी दृढ करण्यासाठी, त्या अक्षयवटला भेट देतील आणि पूजा करतील.
पवारांच्या वर्चस्वाला बसली खीळ, हे तर खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ!
राष्ट्रपतींची ही भेट केवळ प्रयागराजसाठी ऐतिहासिक नाही तर देशभरातील भाविकांसाठी एक प्रेरणादायी क्षण आहे. त्यांची उपस्थिती महाकुंभाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाला एक नवीन उंची देत आहे. राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याआधी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही महाकुंभात पवित्र स्नान केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App