अवघ्या जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मिशन चांद्रयान-3 वर केवळ भारताच्याच नाही तर जगभरातील वैज्ञानिकांसह सर्वसामान्यांच्या नजरा खिळल्या आहेत. चांद्रयान चंद्रवर उतरण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे. तसे लोकांच्या हृदयाचे ठोकेही वाढत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक ‘मून मिशन’च्या यशासाठी प्रार्थना करत आहेत.मिशन मूनच्या यशस्वीतेसाठी देशभरात मंदिर, मशीद, गुरुद्वार आणि चर्चमध्येही प्रार्थना केली जात आहे. Prayers for soft landing of Chandrayaan 3 in temples mosques gurdwaras all over the country
काशी, मथुरा आणि हरिद्वारमध्ये सकाळपासूनच हवन-पूजन सुरू आहे. त्याचवेळी तामिळनाडूतील रामेश्वरम मंदिरात शिवाची पूजा करण्यात आली. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही प्रार्थना केली गेली. मिशन मूनच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिल्लीतील बंगला साहिब गुरुद्वारामध्ये नतमस्तक होऊन प्रार्थना केली . त्याच वेळी, ओडिशातील भुवनेश्वरमध्ये, मुस्लिमांनी मिशन मूनच्या यशासाठी नमाज अदा केली. याशिवाय प्रयागराजमधील शाळकरी मुलांनी वाळूवर चंद्राचे चित्र कोरून यशासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा यावेळी चांद्रयानवर खिळल्या आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजेच ६.४ मिनिटांनी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात यशस्वी झाल्यानंतर अंतराळ क्षेत्रात भारताकडून ही मोठी झेप असेल. जर मिशन मून यशस्वी झाले तर भारत हा एकमेव देश असेल जो या भागावर सॉफ्ट लँडिंग यशस्वी होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App