वृत्तसंस्था
प्रयागराज : Prayagraj यूपीच्या प्रयागराजमध्ये झालेल्या SSC-GD भरती परीक्षेदरम्यान मंगळवारी सर्व्हर फेल झाल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यांनी खोल्यांमध्ये ठेवलेले संगणक आणि खुर्च्या तोडण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करू लागले.Prayagraj
यानंतर विद्यार्थ्यांनी प्रयागराज-वाराणसी महामार्गही जाम केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अर्ध्या तासानंतर मोठ्या प्रयत्नाने परिस्थिती शांत केली. गोंधळानंतर आजची परीक्षा रद्द करण्यात आली.Prayagraj
परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाउन झाला
प्रकरण सरायइनायत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. परीक्षा अंदावा येथील सुनीता सिंह सीता सिंह महाविद्यालयात तीन शिफ्टमध्ये (पहिली: सकाळी 10 ते 11, दुसरी: दुपारी 1 ते 2 आणि तिसरी: सायंकाळी 4:30 ते 5:30) होणार होती. पहिल्या शिफ्टची परीक्षा निर्धारित वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू झाली.
यासाठी 600 परीक्षार्थी होते, परंतु केवळ 450 परीक्षार्थी उपस्थित राहिले. परीक्षा सुरू होताच संगणकाचा सर्वर डाउन झाला. यावर परीक्षार्थी गोंधळ घालू लागले होते. गोंधळानंतर आजची परीक्षा रद्द करण्यात आली.
सराय इनायत पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय गुप्ता यांनी सांगितले की, अनेक संगणक आणि वर्गखोल्यांमधील फर्निचरचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली, त्यांची ओळख पटवून कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर, तांत्रिक पथकाला बोलावून सर्वर संबंधित समस्येची चौकशी करण्यासाठी आणि परीक्षेचे वेळापत्रक पुन्हा निश्चित करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.
SSC म्हणाले – नवीन तारखांची घोषणा लवकरच होईल
SSC चे प्रादेशिक प्रमुख आशिष कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, परीक्षेत तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून अहवाल शिक्षण विभाग आणि संबंधित परीक्षा प्राधिकरणाला पाठवला जाईल. परीक्षार्थ्यांनीही शांतता राखावी. तसेच, आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
स्थानिक ग्रामस्थ आणि वाहतूक पोलिसांनी सांगितले की, वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु, लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
25 मे रोजीही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता.
सोमवारी प्रयागराजमधील सुनीता सिंह सीता सिंह महिला महाविद्यालयाच्या आय-टेक झोन परीक्षा केंद्रावरही गोंधळ झाला होता. दुसऱ्या शिफ्टमध्ये जागांपेक्षा दुप्पट उमेदवार पोहोचले, त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड सुरू केली. उमेदवारांनी अनेक खोल्यांमध्ये ठेवलेले संगणक, मॉनिटर, एसी, कूलर, सीसीटीव्ही, सर्व्हर, जॅमर आणि वॉटर कूलरसह अनेक उपकरणे तोडली.
यानंतर विद्यार्थ्यांनी जीटी रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत केले. याच दरम्यान पोलिसांनी लॅपटॉप घेऊन पळून जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.
Server Outage Triggers Violent Student Protest at SSC Exam in Prayagraj
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने NTA ला विचारले-मागील चुकीतून काय शिकला? तुम्ही कोणताही धडा घेतला नाही, हे दुःखद
- इंधनाची बचत म्हणजेच इंधनाची निर्मिती : ST ची डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम; दररोज १००० लिटर डिझेलची बचत!!
- बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पण पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!
- एस.जयशंकर यांच्या व्हिडिओतील वक्तव्यात फेरफार केल्याचे उघड !