कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद बनले ‘CBI’चे नवे प्रमुख!

१९८६ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्नाटकचे विद्यमान पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे पुढील दोन वर्षांसाठी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयचे विद्यमान प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सूद २५ मे रोजी पदभार स्वीकारतील. डीजीपी सूद हे १९८६ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. Praveen Sood has been appointed as the Director of the Central Bureau of Investigation

डीजीपी प्रवीण सूद मार्चमध्ये प्रकाशझोतात आले जेव्हा कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी त्यांच्यावर राज्यातील भाजपा सरकारला संरक्षण दिल्याचा आरोप केला. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा दावा करत राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अटकेची मागणी केली होती.

द हिंदूने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सूद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी आणि सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या पॅनलने निवड केली आहे. चौधरी यांनी सूद यांच्या शिफारशीविरोधात असहमत नोट सादर केली आहे कारण ते सीबीआयच्या सर्वोच्च पदासाठी निवडलेल्या अधिकार्‍यांच्या मूळ पॅनेलमध्ये नव्हते आणि शेवटच्या क्षणी त्यांचा समावेश करण्यात आला होता.

सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जैस्वाल यांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपत असून, त्यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Praveen Sood has been appointed as the Director of the Central Bureau of Investigation

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub