विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कन्या वांगमयी परकला यांचे प्रतीक दोशी यांच्यासोबत अत्यंत साध्या पद्धतीने लग्न झाले आहे. वांगमयी परकला यांनी बंगळुरूमध्ये एका घरगुती समारंभात हा विवाह केला आहे. हा विवाह सोहळा अतिशय खासगी आणि साध्या पद्धतीने पार पडल्याने त्याची देशभरात चर्चा होत आहे. यात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. यावेळी कोणीही व्हीआयपी आणि राजकीय पाहुणे दिसले नाहीत.Pratik Doshi Profile Who is Nirmala Sitharaman’s son-in-law Pratik Doshi? PM Modi has a special relationship with Gujarat
निर्मला सीतारामन यांच्या कन्या वांगमयी परकला या व्यवसायाने पत्रकार आहेत. यानिमित्त निर्मला सीतारामन यांचे जावई प्रतीक दोशी काय करतात, ते कोण आहेत हे सर्वसामान्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
कोण आहेत प्रतीक दोशी?
निर्मला सीतारामन यांचे जावई प्रतीक दोशी हे गुजरातचे असून ते पीएमओमध्ये अधिकारी आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अधिकारी आहेत आणि पीएमओच्या संशोधन आणि धोरण शाखेत ते काम करतात. ते 2014 पासून पीएमओशी संबंधित आहेत. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची दिल्लीला बदली झाली. यानंतर 2019 मध्ये त्यांना सहसचिव पदावर बढती देण्यात आली. प्रतीक दोशी यांनी सिंगापूरच्या मॅनेजमेंट स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोशी सीएमओमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होते. त्यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाल्यास, पीएमओ वेबसाइटनुसार, ते लेव्हल 14 पे ग्रेड ऑफिसर आहेत आणि त्यांचा पगार 1.57 लाख रुपये आहे.
वांगमयी परकला यांच्याबद्दल…
वांगमयी परकला या निर्मला सीतारामन आणि परकला प्रभाकर यांच्या कन्या आहेत. परकला प्रभाकर राजकारणातही सक्रिय आहेत. त्यांनी आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे पद भूषवले आहे. निर्मला सीतारामन यांच्या मुलीचे शालेय शिक्षण हैदराबादमधून झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या अमेरिकेला गेल्या. त्यांनी मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्या भारतातील तसेच परदेशातील अनेक न्यूज पोर्टल्ससाठी काम करतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या मीडिया आणि सार्वजनिक जीवनापासून दूर राहतात.
https://youtu.be/U4bhL2Qj88o
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App