वृत्तसंस्था
कोल्हापूर : Prashant Koratkar आरोपी प्रशांत कोरटकर यांने त्याच्या मोबाईल मधील डाटा डिलीट केला आहे. असे त्याने का केले? तसेच हा आरोपी एक महिना फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे गरजेचे असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता. त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, तसेच आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. त्यासाठी न्यायालयाला ऑर्डर करावी लागेल. त्यामुळे तसे आदेश देण्याची मागणी देखील सरकारी वकील यांनी केली होती. त्यानंतर न्यायालच्या वतीने कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.Prashant Koratkar
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून दुपारी 2:45 वाजता ताब्यात घेतले असून त्याला कोल्हापूरला आणले आहे.आज त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले गेले. दरम्यान कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जमा झाले होते. ते चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, नागरिकांनी त्याला कोल्हापुरीचा प्रसाद देण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी त्याला मागच्या दाराने न्यायालयात हजर केले होते.
दरम्यान जुना राजवाडा परिसरात नागरिक हातात कोल्हापुरी चपला घेत दाखल झाले होते. कोरटकरला कोल्हापुरी चपलेने प्रसाद दिल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याला पोलिसांचे संरक्षण देण्यात येत आहे. तो काय सरकारचा जावाई आहे का? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला.
प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिस गत 25 फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सोमवारी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतले. तेलंगणात त्याच्या अटकेची योग्य ते सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले गेले. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला तिथे आणले गेले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
काय म्हणाले कोल्हापूर पोलिस?
प्रशांत कोरटकरचा नागपूर, इंदूर, मुंबई, चंद्रपूर येथे शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके गठीत केली होती. सदर आरोपीचा अटकपूर्व जामीन देखील कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला होता. आज देखील आरोपीच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होती. दुपारी साडेचार वाजता ही सुनावणी होणार होती. परंतु, त्याआधीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने रद्द केलेला आहे. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतले असून पोलिसांचे पथक त्याला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. रात्री उशिरा आरोपीला कोल्हापुरात आणल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून उद्या न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहिती कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर बऱ्याच अँगलने तपास करत होते. त्यामध्ये राजवाडा पोलिसा ठाण्याची देखील दोन पथके होती. स्थानिक गुन्हे शाखेची पथके गठीत केली होती. बरीचशी माहिती आम्हाला प्रसारमाध्यमांमधून मिळत होती. काही टोलनाक्यांवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. आरोपी एका वाहनातून जात असताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला. त्यानंतर पथके तेलंगाणाकडे रवाना करण्यात आली, असे महेंद्र पंडित यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App