‘’ज्यांचा स्वत:चा ठिकाणा नाही. ते लोक काय कोणाला पंतप्रधान करतील?’’ असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : जनसुराज पदयात्रेसाठी प्रशांत किशोर संपूर्ण बिहारचा दौरा करत आहेत. यादरम्यान ते सातत्याने सर्वच पक्षांवर निशाणा साधत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘’जर तेजस्वी यादव हे लालू यादव यांचे पुत्र नसते, तर देशात अशी कोणतीही नोकरी नाही, जी त्यांना त्यांच्या गुणवत्तेवर मिळेल.’’ Prashant Kishors Nitish Kumar and Tejashwi Yadav
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले, ‘’नितीशकुमार आणि आरजेडी यांचा स्वत:चा ठिकाणा नाही. ते लोक काय कोणाला पंतप्रधान करतील? २०२४मध्ये नितीश कुमार यांची अवस्था चंद्राबाबू नायडूंसारखी होईल.’’
#WATCH | "Tejashwi Yadav talked about providing 10 lakh jobs in the first cabinet meeting itself…everyone knows he can't give 10 lakh jobs. If Tejashwi Yadav was not the son of Lalu Prasad Yadav, what job would he have got in the country?": Prashant Kishor pic.twitter.com/WMINher3YI — ANI (@ANI) April 25, 2023
#WATCH | "Tejashwi Yadav talked about providing 10 lakh jobs in the first cabinet meeting itself…everyone knows he can't give 10 lakh jobs. If Tejashwi Yadav was not the son of Lalu Prasad Yadav, what job would he have got in the country?": Prashant Kishor pic.twitter.com/WMINher3YI
— ANI (@ANI) April 25, 2023
प्रशांत किशोर यांनी हा शाब्दिक हल्ला अशावेळी केला आहे, जेव्हा नितीश आणि तेजस्वी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीश आणि तेजस्वी यांनी अलीकडेच सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची लखनऊमध्ये आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात भेट घेतली. यापूर्वी नितीश आणि तेजस्वी यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App