प्रशांत किशोरचा झाला “राज ठाकरे”…; कोणीतरी मजबूत विरोधी पक्ष द्या हो!!


प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि आता बिहारमध्ये होऊ घातलेले राजकीय नेते प्रशांत किशोर यांचा आता “राज ठाकरे” झाला आहे…!! प्रशांत किशोर यांना नेमकी स्वतःचीच भूमिका ठामपणे ठरवता येत नाहीए…!! Prashant Kishor is politically confused as Raj Thackeray

आधी विविध राज्यांमध्ये निवडणूक रणनीतीकार म्हणून वेगवेगळ्या पक्षांना मदती पण नेहमीच विजयाची 50 % हून अधिक शक्यता असलेल्या पक्ष्यांबरोबर रणनीतीची हातमिळवणी, पण कधीच पराभूत होणाऱ्या पक्षाला विजयाकडे न नेण्याची हातोटी…!! यामुळे प्रशांत किशोर यांचे रणनीतीकार म्हणून यश मर्यादित राहिले आणि आता त्यांनी बिहार मध्ये स्वतः राजकीय उदय घडवून आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. पण त्यांच्यातला रणनीतीकार त्यांना गप्प बसू देत नाही. इंडियन एक्सप्रेसच्या ई अड्डाला दिलेल्या मुलाखतीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.

प्रशांत किशोर यांनी दिलेली उत्तरे परस्पर विसंगत आहेत. त्यात त्यांना राजकीय चतुराई वाटत असली तरी यातली विसंगती लपून राहत नाही. एकीकडे ते काँग्रेसचे बलस्थान “घराण्याचा वारसा” म्हणतात, तर दुसरीकडे त्यालाच कमकुवत ठरवतात. एकीकडे भाजपची “संघटना” मोठी म्हणतात दुसरीकडे मोदींसारखे प्रखर आणि प्रबळ नेतृत्वावर अवलंबून राहू नये म्हणतात. एकीकडे सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर 2024 मध्ये भाजपचा पराभव शक्य आहे, असे म्हणतात तर दुसरीकडे येत्या 20 – 25 वर्षात भाजपला सत्तेवरून हटवता येणार नाही, असे देखील म्हणतात.

या सर्व उत्तरांमध्ये प्रशांत किशोर यांची स्वतःची लॉजिक आहेत, पण ती तशीच देशाच्या राजकीय व्यवस्थेला आणि राजकारणाला लागू होतील ही त्यांची धारणा खरच 100% वस्तुस्थितीला धरून आहे का??, हा खरा प्रश्न आहे.राज ठाकरे यांनी मनसे आधीच्या निवडणुकीत मला विरोधी पक्ष व्हायचे आहे, असे जाहीर केले होते. त्यानंतर ते पुन्हा सुप्तावस्थेत गेले. तसाच प्रशांत किशोर यांना देशात भाजपच्या विरोधात मजबूत विरोधी पक्ष उभा करायचा आहे. पण त्या दिशेने पावले मात्र पडताना दिसत नाहीत.

पहिले 50 वर्षे केंद्रीय पातळीवर काँग्रेसला विरोधी पक्ष आव्हान देऊ शकले नव्हते तसेच पुढच्या 20 – 25 वर्षांत केंद्रीय पातळीवर भाजपला आव्हान ठरेल असा कोणताही पक्ष उरलेला नाही म्हणून पहिल्यांदा देशपातळीवर मजबूत विरोधी पक्ष तयार व्हावा, अशी प्रशांत किशोर यांची इच्छा आहे. प्रशांत किशोर यांच्या इच्छेचा नेमका अर्थ काय?? ते स्वतः उदयोन्मुख राजकीय नेता होताना त्यासाठी कोणते काम करणार आहेत?? सर्व विरोधी पक्षांच्या एकमेकांमधल्या राजकीय विसंगतीवर ते कशी मात करणार आहेत?? काँग्रेस देशपातळीवर विरोधी पक्ष आहे पण तो सुस्तावलेला आहे, असे प्रशांत किशोर यांचे मत आहे. पण काँग्रेस कशी मजबूत होणार??, काँग्रेसचे हायकमांड पक्षातल्या सुस्तावलेपणाला कसे दूर करणार??, याचा फार्म्यूला प्रशांत किशोर यांनी दिला खरा पण ते काँग्रेसमध्ये जाता जाता राहिले!!

अशा स्थितीत देशात राष्ट्रीय पातळीवर मजबूत विरोधी पक्ष तरी कसा तयार होणार??, हा यातला कळीचा मुद्दा आहे… आणि याच अर्थाने प्रशांत किशोर यांचा “राज ठाकरे” झाल्याचे दिसून येते. राज ठाकरे यांना जशी स्वतःची भूमिका निश्चित करता आली नाही, त्यामुळे करिष्मा असूनही पक्ष संघटनात्मक पातळीवर फार पुढे वाटचाल करता आली नाही, तशीच अवस्था प्रशांत किशोर यांची झाल्याचे दिसून येत आहे!!

-काँग्रेसचे चिंतन शिबिर पंक्चर करण्याचा डाव

आणखी एक कळीचा मुद्दा प्रशांत किशोर यांच्या मुलाखतीतून दिसतो आहे. काँग्रेसचे चिंतन शिबिर जयपूर मध्ये होत आहे. तेथे काँग्रेस हायकमांड गांभीर्याने काँग्रेसच्या राजकीय भवितव्याची चर्चा करणार आहे. तब्बल 400 नेते यात सहभागी होणार आहेत. अशा वेळी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या संघटनेविषयी नेतृत्वाविषयी संशय आणि संभ्रम तयार करणे यामागे नेमका कोणाचा “हात” आहे?? हा संशोधनाचा विषय आहे.

त्याचबरोबर कालच्या कोल्हापुरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्यायी नेतृत्व देण्यात विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत, असे वक्तव्य करून काँग्रेसच्या चिंतन शिबिराला एक प्रकारे पंक्चर करण्याचा असाच प्रयत्न केला आहे. प्रशांत किशोर, शरद पवार यांची वक्तव्ये नेमके काय सूचित करतात?? देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे हे सांगतात??, याचीही चिंता आणि चिंतन काँग्रेसने करण्याची गरज आहे.

Prashant Kishor is politically confused as Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात